आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक जिल्ह्यात जोरदार पावसाची अपेक्षा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड- जुलैतील पहिला आठवडा सरला तरी नाशिक जिल्ह्यात जोरदार पाऊस नसल्याने शेतकऱ्यांत चिंता वाढू लागली आहे. धरणसाठ्याबरोबरच खरीप पेरण्यांवर परिणाम होण्याची चिन्हे आहेत. मंगळवारी जिल्ह्यात १८ मिलिमीटर पाऊस झाला. यामध्ये इगतपुरीत ९, पेठला ६, सुरगाण्यात ३ मिलिमीटर पाऊस झाला तर उर्वरित १२ तालुके कोरडे होते.

 

दोन दिवसांपासून हवामान विभागाने जोरदार पावसाचा अंदाज वर्तविला होता. मात्र, नाशिक विभागात फक्त नाशिक आणि जळगावलाच चांगला पाऊस झाला. तर, नंदूरबार, अहमदनगर आणि धुळे जिल्हे कोरडेच होते.


रेल्वेगाड्यांना विलंब 
मुंबईमध्ये जोरदार पावसामुळे रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांना विलंब होत आहे. मंगळवारी पुष्पक एक्स्प्रेस ४० मिनिटे तर गीतांजली एक्स्प्रेस एक तास उशिराने नाशिकरोड रेल्वेस्थानकात दाखल झाली. 

बातम्या आणखी आहेत...