आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तोतया वकिलाने जिल्हा न्यायाधीशांना फसवले, 'फ्रॉड ऑन कोर्ट'चे आदेश

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - तोतया वकील बाळासाहेब चौधरीने प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीशांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले अाहे. यासंदर्भात जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी फसवणूक झाल्याची अॉर्डर मंगळवारी (दि. ६) काढली.

 

अॅड. आर. डी. बाफणा यांनी दिलेल्या माहितीनुसार आमदार सीमा हिरे यांनी बाळासाहेब चौधरी ऊर्फ गोपाळ अनंत अडावदकर यांच्याविरोधात गंगापूर पोलिस ठाण्यात ५० लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात संशयित चाैधरी यांनी गंगापूर पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात जामीन मिळावा याकरिता दाखल केलेल्या अर्जात सेवानिवृत्त अायकर अायुक्त व लिगल प्रॅक्टिशनर असल्याचे भासवत मुंबई उच्च न्यायालयाची दिशाभूल करत जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.


या केसमध्ये न्यायालयाने सकृतदर्शनी पुरावे असल्याने तपासाची गरज असून, वकील असल्याचे सांगत अनेकांनी फसवल्याने चौधरींचा जामीन अर्ज फेटाळला. न्यायाधीश एम. एच. मोरे यांनी जामीन अर्ज फेटाळला. चौधरी यांच्याकडून याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल करणे गरजेचे असताना त्यांनी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला.


यामध्ये चौधरी यांनी न्यायालयाने केलेली ऑर्डर दाखल आणि सेकंडरी बेल अॅप्लिकेशन असा उल्लेख न करता वेगळा अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करत प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीशांची फसवणूक करत जामीन मिळवला. याविरोधात आमदार हिरे यांच्या वतीने अॅड. आर. बी. राठोड, सरकार पक्षाकडून अॅड. अजय मिसर यांनी बाजू मांडत चाैधरी यांनी दिशाभूल करून जामीन मिळवल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद एेकून घेत जामीन अर्ज फेटाळत व नामंजूर करत 'फ्रॉड ऑन कोर्ट' अशी ऑर्डर न्यायालयाने दिला. चाैधरी यांनी अॅड. बाफणा यांची फसवणूक करत २२ लाखांना गंडा घातला होता. या गुन्ह्यात चौधरी ९३ दिवस कारागृहात होते. १९९५ मध्ये धुळे न्यायालयात चाैधरीच्या सख्ख्या भावाने फौजदारी केस दाखल केली आहे. या गुन्ह्यात चौधरीला अटक झाली असल्याचे अॅड. बाफणा यांनी सांगितले.

 

बातम्या आणखी आहेत...