आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतीमालास याेग्य भाव मिळण्यासाठी रास्ता राेकाे; शेतकऱ्यांनी अाेतले रस्त्यावर कांदे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

निफाड- शेतीमाल व दुधाला योग्य भाव मिळविण्यासाठी राज्यात शेतकरी संप सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर निफाड येथेही शुक्रवारी शेतकऱ्यांनी शांतीनगर चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन केले. शुक्रवारी सकाळी दहा वाजता शांतीनगर चौफुलीवर नाशिक-औरंगाबाद हायवेवर शेतकऱ्यांनी बैलगाड्या, ट्रॅक्टर अाडवे लावून रस्त्यावर कांदे ओतून निषेध केला. 
रास्ता रोकोप्रसंगी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अनिल कुंदे, लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सुभाष कराड, राजेंद्र बोरगुडे, जानकीराम धारराव यांनी शेतकऱ्याची भूमिका मांडली. 


अनिल कुंदे यांनी भाजप-शिवसेना सरकारवर टीका करत म्हटले की, शेतकरी कर्जबाजारी झाला असून उताऱ्यावर कर्ज लिहायला जागा राहिलेली नाही. उसासह कांद्याला भाव नसल्याने शेतकऱ्याचे हाल होत आहे. कर्जमाफीचे गाजर दाखवून शेतकऱ्यांना वेड्यात काढण्याचे काम भाजप व शिवसेनेचे सरकार करत आहे. आंदोलन मोडून काढण्यासाठी पोलिसांचा वापर केला जात असल्याचा आरोप केला. यावेळी भीमराज काळे, शिवाजी ढेपले, संपत व्यवहारे, नगरसेवक देवदत्त कापसे, जानकीराम ढेपले, भास्कर धारराव, खंडू आव्हाड, रमेश जाधव सहभागी झाले हाेते. 

बातम्या आणखी आहेत...