आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार अामदारांच्या घरासमाेर शेतकऱ्यांचे ठिय्या अांदाेलन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड- शेतकऱ्यांचा सातबारा कोराच झालाच पाहिजे, संपूर्ण वीजबिल माफ झालेच पाहिजे, शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी केंद्र सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशा घाेषणा देत नाशिक जिल्हा शेतकरी आंदोलन समितीच्या वतीने जिल्ह्यातील आमदारांच्या घरासमाेर शुक्रवारी (दि. २५) आंदोलन करण्यात आले. मात्र यामध्ये बहुतांश आमदारांनी शेतकऱ्यांच्या या आंदोलनाकडे   पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. 


शेतकरी कर्जाच्या खाईत लाेटला गेला असून त्याची स्थिती बिकट झाली अाहे. स्वामिनाथन अायाेगाने केेलेल्या शिफारशी अद्याप लागू करण्यात अालेल्या नाहीत. शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्यात यावा. तसेच शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती द्यावी अशा विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या संघटनांनी एकत्र येत स्थापलेल्या नाशिक जिल्हा शेतकरी आंदोलन समितीच्या वतीने शुक्रवारी आमदारांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्यात अाले. समितीचे निवेदन भाजपचे अामदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, सीमा हिरे यांनी स्वीकारले. मात्र, शिवसेनेचे अामदार व राज्यमंत्री दादा भुसे, आमदार योगेश घोलप, अनिल कदम हे मुंबई येथे गेल्याने त्यांना निवेदन देता अाले नाही. 


पालकमंत्री अाणि दोन्ही खासदारांच्या घरासमाेर उद्या ठिय्या 
शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी रविवारी (दि. २७) पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या कार्यालयासमाेर तसेच संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, खासदार हेमंत गोडसे, खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या कार्यालयाबाहेर शेतकरी समितीच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...