आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्याच्या पत्नीने कर्जामुळे घेतला गळफास; कर्जमाफी यादीत नाव नसल्याने होता तणाव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिन्नर- भोकणी येथील शोभा कांताराम कुऱ्हाडे (४५) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी ११ वाजता घडली. कर्जबाजारीपणा व कर्जमाफीच्या यादीत नाव न आल्याने त्या तणावाखाली होत्या, अशी माहिती कुऱ्हाडे यांच्या नातलगांनी दिली. वावी पोलिसांकडून तपास सुरू आहे. घटनेची माहिती घेण्याची सूचना तहसीलदार नितीन गवळी यांनी मंडल अधिकाऱ्यांना दिली आहे. 


कांताराम कुऱ्हाडे यांची अडीच एकर शेती असून, विविध कार्यकारी सोसायटीकडून त्यांनी कर्ज घेतले होते. शिवाय नातलगांकडूनही हातउसने पैसे घेतले असल्याचे समजते. कर्जमाफीच्या यादीत नाव येईल, अशी अपेक्षा कुऱ्हाडे कुटुंबीयांना होती. तथापि, यादीत नाव न आल्याने. कर्जफेड होत नसल्याने शोभा तणावाखाली होत्या. शोभा यांनी गळफास घेतल्याचा प्रकार शेजारऱ्यांच्या निदर्शनास आला. 


शोभा यांना दोन मुले, दोन मुली आहेत. मुलींचे विवाह झाले असून मोठा मुलगा जिल्हा मध्यवर्ती बँकेत रोजंदारीवर आहे तर लहान मुलाचे शिक्षण सुरू आहे. कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याची चर्चा ग्रामस्थांत आहे. वावी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून सहायक निरीक्षक रणजित आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राजेंद्र केदारे तपास करत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...