आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रत्येक साेसायटी, बंगले अाणि दुकानांच्या परिसरात अाता \'खत प्रकल्प\' अनिवार्य; अायुक्तांचा नवा अादेश

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- अाेला अाणि सुका कचरा विलगीकरणाची प्रक्रिया सुरळीत हाेत नाही, ताेच अाता महापालिका अायुक्तांनी सर्व साेसायट्या, अपार्टमेंट, बंगले, व्यापारी संस्था अाणि हाॅटेल व्यावसायिकांना अाेल्या कचऱ्यावर जागीच प्रक्रिया करण्यासाठी व्यवस्था कार्यान्वित करण्याच्या सूचना दिल्या अाहेत. त्यासाठी येत्या १५ अाॅगस्टची मुदत देण्यात अाली अाहे. अाेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून केवळ सुका कचराच घंटागाडीत द्यावा, असे अायुक्तांनी म्हटले अाहे. 


गेल्या एप्रिल महिन्याच्या प्रारंभापासून अाेला अाणि सुका कचरा एकत्रित न देता त्याचे विभाजन करून दाेन डस्टबिनमध्ये घंटागाडीत संकलित करण्याची कार्यवाही सुरू करण्यात अाली अाहे. एकत्रित कचरा देणाऱ्यावर दंडात्मक कारवाईचाही बडगा उगारण्यात येत अाहे. त्यामुळे अाता घंटागाडीत जवळपास ७० ते ८० टक्के कचरा अाेला अाणि सुका अशा दाेन भागांमध्ये संकलित हाेताे. ही व्यवस्था रुळल्यानंतर अाता अायुक्तांनी नवे अादेश काढत अाेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणारी व्यवस्था साेसायट्या व व्यावसायिकांनी करण्याची सूचना जारी केली अाहे. या अादेशात म्हटले अाहे की, घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ कायद्याच्या चाैथ्या मुद्द्यात कचऱ्याची विल्हेवाट लावण्याप्रतीचे कर्तव्य काय अाहेत याबाबत ऊहापाेह अाहे. कलम ४ (६) अन्वये विघटीत हाेणारा कचऱ्यावर खत निर्मितीची प्रक्रिया हाेणे गरजेचे अाहे. कलम ४ (८) अन्वये सर्व हाॅटेल्स, रेस्टाॅरंटने यासाठी अापल्या अस्थापनापरिसरात खत तयार करण्यासाठी प्रकल्प उभारावा. सर्व साेसायटी, अपार्टमेंट, व्यापारी संस्था, हाॅटेल व्यावसायिक यांना सुचित करण्यात येते की, अापल्या ठिकाणी निर्माण हाेणाऱ्या अाेल्या कचऱ्यावर जागीच प्रक्रिया करण्यासाठी व्यवस्था कार्यान्वित करावी व सुका कचरा महापालिकेकडे हस्तांतरीत करावा. नागरिकांनी याप्रमाणे पालन करून १५ अाॅगस्टपर्यंत उपराेक्त प्रमाणे पूर्तता करून याबाबतची माहिती महापालिकेला द्यायची अाहे. 

 

कचरा वेचक महिलांची 'सेवा' 
शहरातील सेवा या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने ठिकठिकाणी अाेल्या कचऱ्यापासून खत निर्मितीचे काम सुरू अाहे. या प्रकल्पात कचरा वेचक महिला काम करीत असून इमारतींमधील कचरा उचलण्यापासून तेथे छाेटेखानी खत निर्मितीचा प्रकल्प कार्यान्वित करणे अाणि त्याची राेजच्या राेज व्यवस्था बघण्याचे काम महिला बघत अाहेत. म्हसरूळ येथील 'निशिगंध एन्क्लेव्ह' इमारतीत असा अादर्श प्रकल्प सुरू अाहे. 


कचरा पुन्हा एकत्र हाेताे त्याचे काय? 
नागरिकांनी अाेला अाणि सुका अशा स्वरूपात दिलेला कचरा घंटागाडीत वा खत प्रकल्पात पुन्हा एकत्रित केला जात असल्याचा प्रकार 'दिव्य मराठी'ने उघडकीस अाणला हाेता. त्यानंतरही परिस्थितीत फारशी सुधारणा झालेली दिसत नाही. त्यामुळे प्रथमत: महापालिकेने अापली कार्यप्रणाली सुधारावी अाणि त्यानंतर नागरिकांवर नियम लादावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात अाहे. 


सरकारी कार्यालये व महापालिकेपासून व्हावी सुरुवात 
नियमाप्रमाणे ५ हजार चाैरस मीटर जागेवर असलेल्या प्रत्येक रहिवासी इमारती वा निवासस्थानांमध्ये अाेला कचऱ्यावर प्रक्रिया करणारी व्यवस्था असावी. जवळपास सर्वच सरकारी व महापालिकेची कार्यालये तसेच अधिकाऱ्यांची निवासस्थाने ५ हजार चाैरस मीटरपेक्षा अधिक जागेत अाहेत. त्यामुळे या नियमाच्या अंमलबजावणीस सरकारी व महापालिकेपासून प्रारंभ व्हावा, अशी मागणी पुढे अाली अाहे. 

 

बातम्या आणखी आहेत...