आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक: इंडियन ऑइल पेट्रोलपंपाच्या टाकीला आग; सुदैवाने जीवितहानी टळली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- मुंबई-आग्रा महामार्गावरील घोटी येथील इंडियन ऑइलच्या पेट्रोल पंपच्या टाकीला अचनाक आग लागली.  अवघ्या काही वेळा रौद्ररूप धारण केलेल्या आगीला आटोक्यात आणण्यासाठी दोन तास लागले. सुदैवाने या घटनेत कुठलीही जिवितहानी झाली नाही. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली होती.


घोटीजवळील इंडियन ऑईलच्या नटराज पेट्रोल पंपावर वीस हजार   लिटर क्षमतेच्या भूमिगत पेट्रोल टाकीची स्वच्छता करण्याचे काम सुरू होते. या टाकीच्या तळाशी अतिशय थोड्या प्रमाणात पेट्रोल शिल्लक होते. ते पेट्रोल काढण्याचे काम ती कर्मचारी करत होते. दरम्यान पेट्रोल टाकीच्या शेजारून गेलेल्या विद्युत केबलला अछानक शॉर्टसर्किट झाले आणि टाकीला आग लागली. या आगीने हळूहळू रौद्र रूप धारण केले. माहिती घटनास्थळी दाखल झालेल्या अग्नीशामक दलाला आग विझवण्यासाठी तब्बल दोन तास लागले. दरम्यान या आगीत सुदैवाने जीवितहानी झाली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली

बातम्या आणखी आहेत...