आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काेरेगाव भीमा येथील दंगलप्रकरणी अाज सरकारचा पहिला पुरावा अायाेगासमाेर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- काेरेगाव भीमा दंगलप्रकरणी स्थानिकांचे जबाब, प्रत्यक्षदर्शी, जखमी, स्थानिक नागरिकांशी बाेलून तयार केलेला अहवाल व ७२ पाेलिसांचे अडीच ते तीन हजार पानी प्रतिज्ञापत्र साेमवारी या दंगलीच्या चाैकशीसाठी नियुक्त केलेल्या अायाेगासमाेर विशेष सरकारी वकील शिशिर हिरे दाखल करतील. 


उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्या. जयनारायण पटेल यांच्या अध्यक्षतेखाली व माजी मुख्य सचिव सुमीत मलिक सदस्य असलेल्या अायाेगाची नियुक्ती केली. या अायाेगासमाेर पाेलिस तपास व शासनाची बाजू मांडण्यासाठी अॅड. शिशिर हिरे यांची नेमणूक करण्यात अाली अाहे. त्यानुसार, या चाैकशीत २९ डिसेंबर २०१७ राेजी संभाजी महाराजांचे समाधिस्थळ असलेल्या वडूज येथील जाहीर फलकावर संभाजी महाराजांच्या अंत्यसंस्काराविषयी मजकूर हाेता. यावर काही ग्रामस्थांनी अाक्षेप घेतल्याने वाद निर्माण झाला. तिथूनच वादाची ठिणगी पडल्याचे समाेर अाले. ग्रामीण पाेलिसांनी दाेन्ही बाजूंच्या ग्रामस्थांची समजूत काढून फलक हटविला. वाद तात्पुरता मिटला तरी दाेन्ही गटात ते धुमसत हाेते. त्याचेच पर्यवसान दंगलीत झाल्याचा निष्कर्ष काढण्यात अाल्याचे समजते. दंगलीला एल्गार परिषद व माअाेवाद्यांची पार्श्वभूमी असल्याचे तपासात उघडकीस अाले असले तरी ताे तपास पुणे पाेलिस अायुक्तालयाकडून केला जात असल्याने तूर्त या पुराव्यात त्याचा समावेश नसल्याचे सांगण्यात अाले आहे. 


घटनेपासूनचा संपूर्ण घटनाक्रम पुराव्यांनिशी 
 पाेलिसांची बाजू मांडण्यासाठी २९ तारखेच्या पहिल्या घटनेपासून संपूर्ण घटनाक्रम पुराव्यांनिशी सादर केला जाईल. अधीक्षकांचे ७० पानी प्रतिज्ञापत्र व पुरावे जमा करण्यात अाले. घटनास्थळी तीन वेळा प्रत्यक्ष पाहणी केली असून स्थानिकांच्या भेटी घेतल्या अाहेत. अायाेगापुढे घटनेची सत्यता अाणण्याचा प्रयत्न केला जाणार अाहे. अॅड. शिशिर हिरे 

बातम्या आणखी आहेत...