आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एटीएममधून पाचपट रक्कम; पैसे काढण्यासाठी ग्राहकांची गर्दी, नाशिकमधील विजयनगर येथील घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडको- सिडकोतील विजयनगर येथे एका बँकेच्या एटीएममधून रक्कम काढण्यासाठी गेलेल्यांना जितकी रक्कम काढायची त्याच्या पाचपट रक्कम मिळाल्याने या एटीएमवर पैसे काढण्यासाठी साेमवारी (दि. १८) नागरिकांनी एकच गर्दी केली. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी मध्यस्थी करत हे एटीएम बंद केले. 


सोमवारी सायंकाळी विजयनगर येथील अॅक्सिस बँकेच्या एटीएममधून चक्क पाचपट रक्कम मिळत असल्याने नागरिकांनी रक्कम काढण्यासाठी गर्दी केली होती. यामुळे चार तासांत लाखो रुपये काढले गेले. याबाबत अंबड पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी रात्री ११ वाजता जाऊन मध्यस्थी करत एटीएम बंद केले. या एटीएममध्ये बँकेने दुपारी चार वाजता पाच लाख रुपये भरले होते. यानंतर ग्राहकांनी एटीएममधून रक्कम काढण्यास सुरुवात केली. यात एटीएम मशिनमध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने ग्राहकांना पाचपट रक्कम मिळत होती. 


यात एक ग्राहक दोन हजार काढावयास गेले असता त्याला दहा हजार रुपये आले. याची बातमी परिसरात समजताच ग्राहकांनी रक्कम काढण्यासाठी गर्दी केली. यावेळी अमोल गोलाईत हा एटीएममधून चार हजार रुपये काढण्यास आला असता त्याला वीस हजार रूपये आले.  गोलाईत याने घटनेची माहिती. बँकेला दिली. बँकेचे सहाय्यक व्यवस्थापन प्रवीण भिसे यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. अंबड पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर एटीएम बंद करण्यात आले. मात्र, या चार तासांत सुमारे दोन लाखांपेक्षा जास्त रक्कम ग्राहकांनी काढल्याचे निदर्शनास आले आहे.


माहिती घेऊन रक्कम वसूल करणार 
एटीएममध्ये असलेल्या सीसीटीव्ही तसेच ज्या खात्यावरून रक्कम काढण्यात आली ती माहिती घेऊन रक्कम वसूल केली जाणार आहे. 
- प्रवीण भिसे, सहायक व्यवस्थापक 

बातम्या आणखी आहेत...