आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्या माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचा परिसंवाद

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- देशाचे माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम शनिवारी (दि. ७) दुपारी ४ वाजता चाेपडा बंॅक्वेट हाॅल येथे संवाद साधणार आहेत. खासदार कुमार केतकर, उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभय टिपसे आणि प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. 


वाढती महागाई, बेरोजगारी, औद्योगिक क्षेत्रातील मंदी, भारताची आर्थिक परिस्थिती नोट बंदीचे परिणाम, जीएसटी जागतिक अर्थव्यवस्थेचे भारतावर होणारे चांगले वाईट परिणाम यासारख्या महत्वाच्या विषयावर ते संवाद साधणार आहेत. प्रामुख्याने औद्योगिक क्षेत्रातील चार्टर्ड अकाउंटंट, वकिल, प्राध्यापक, बँकिंग क्षेत्र, घाऊक व किरकोळ दुकानदार, कपडा व्यापारी, सुवर्णकार, बांधकाम व्यावसायिक यांच्यासह उद्योजकांना मार्गदर्शन करणार आहेत. तसेच खासदार. केतकर, माजी न्यायाधीश टिपसे हेदेखील मार्गदर्शन करतील. 


या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन शहर व ग्रामीण काँग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी माजी मंत्री शोभा बच्छाव, जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, शहराध्यक्ष शरद आहेर, गटनेते शाहू खैरे, हेमलता पाटील, वत्सला खैरे आदी पदाधिकारी उपस्थित होते. 

बातम्या आणखी आहेत...