आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीच्या खुनानंतर माजी सरपंचाचा विष घेऊन अात्महत्येचा प्रयत्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वडनेरभैरव- चांदवड तालुक्यातील बहादुरीवाडी येथे पतीने धारदार शस्त्राच्या सहाय्याने मंगळवारी (दि. १६) पहाटे पत्नी सायजाबाई बाळू जाधव (४८) यांचा खून केल्याची घटना घडली अाहे. पत्नी मयत झाल्यावर पती बाळू आनंदा जाधव यानेही विषारी औषध सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. 


बहादुरीवाडीचे पोलिसपाटील जगन शेंडे यांनी या घटनेची माहिती चांदवड पोलिसांना दिली. दह्याने-जांबुटके ग्रामपंचायतीचे पाच वर्षे सरपंच असलेले बाळू जाधव यांना बहादुरी येथील आजोळची जमीन मिळाल्याने ते काही दिवसांपासून बहादुरीवाडी येथे सहकुटूंब राहत हाेते. त्यांची पत्नी सायजाबाई जाधव यांनी जांबुटके येथे अंगणवाडी सेविका म्हणून काम केलेले हाेते. काही महिनद्यापूर्वीच त्यांनी अंगणवाडी सेविकापदाचा राजीनामा दिला हाेता. रात्री मुलगा, सून शेजारच्या खोलीत झोपलेले असताना हा प्रकार घडला. त्यांच्या एका मुलाचा व चारही मुलींचा विवाह झाला अाहे. सहायक पोलिस निरीक्षक नितीन पाटील याबाबत तपास करीत अाहे. 

बातम्या आणखी आहेत...