आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकमध्ये केबीसीची पुनरावृत्ती, दामदुपटीच्या अमिषाने अनेकांना कोट्यावधींचा गंडा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- दामदुपटीच्या अमिषाने अनेकांची कोट्यावधींची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन लोकांना अटक केली आहे. विशेष म्हणजे तीन वर्षांपूर्वी केबीसी नावाच्या कंपनीने हजारो लोकांना असाच गंडा घातला होता. यानंतरही दामदुप्पट योजनेच्या आमिषाला बळी पडून फसवणूक होण्याचे प्रकार थांबलेले नाहीत.  

 

मिळालेल्या माहितीनुसार कोपरगावच्या व्हिनस कॅपिटल कंपनीने दामदुपटीच्या आमिषाने शेतकरी, शिक्षक, निवृत्त लष्करी जवान व्यावसायिक अशी अनेकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे. कोपरगावसह नाशिक, नगर, पुणे जिह्यातील असंख्य गुंतवणूकदार तक्रारीसाठी पुढे येत आहेत. कोपरगावसह नाशिक शहर आणि ग्रामीण पोलिसांतही फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आहेत. 


याप्रकरणी तीन संशयितांना कोपरगाव पोलिसांनी अटक केली आहे. नाशिक गुन्हे शाखेच्या माध्यमातून पुढील तपास सुरु आहे. नाशिकमध्ये तीन वर्षांपूर्वी अशाच उघडकीस आलेल्या अडीचशे कोटींच्या केबीसी घोटाळ्याने सारेच चक्रावले होते. कंपनीचा संस्थापक भाऊसाहेब चव्हाण आणि त्याच्या पत्नीने जामीनावर सुटल्यानंतर  सिंगापूर गाठले होते. त्यानंतर भाऊसाहेब सिंगापूरहून मुंबईला परतत असताना विमानतळावरच पोलिसांनी त्याला अटक केली होती. 

बातम्या आणखी आहेत...