आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अांतरराष्ट्रीय कंपनीत नोकरीचे अामिष, तरुणाला अाॅनलाइन गंडा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- अांतराष्ट्रीय कंपनीमध्ये नोकरीचे अामिष देत मोबाइल आणि इ-मेलद्वारे संपर्क साधून बेरोजगार तरुणाला ६० हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार बुधवारी (दि. २८) सातपूरच्या कामगारनगर येथे उघडकीस आला. संशयिताच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती आणि मंगेश वाजे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार लिगल साथी राजस्थान कंपनी आणि सेवन लिमिटेड कंपनी (ब्रिटन) या कंपनीच्या बोगस इ-मेल अकाउंटद्वारे वाजे यांना इ-मेल आणि मोबाइलवर संपर्क साधत कंपनीमध्ये भरघोस वेतनाची नोकरी असल्याचे सांगत कंपनीच्या नियमांप्रमाणे प्रोसेस फी म्हणून पैसे भरण्यास सांगितले. इ-मेलद्वारे कंपनीची सर्व माहिती दिल्यानंतर विश्वास बसला. 


अांतरराष्ट्रीय कंपनीत चांगली नोकरी मिळणार असल्याने वाजे यांनी संशयिताने दिलेल्या बँक खात्यात वेळोवेळी ६० हजारांची रक्कम भरली. मात्र, दोन महिने उलटूनही नोकरी मिळत नसल्याने वाजे यांना संशय आला. 


संशयिताचा मोबाइल नंबर तसेच इमेल अकाउंट बंद असल्याचे निदर्शनास आले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. सातपूर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ निरीक्षक राजेश आखाडे तपास करत आहे. 


फसवणूक झालेल्यांनी संपर्क साधावा 
संशयिताने अशा प्रकारे अनेक तरुणांना इ-मेल व फोनद्वारे संपर्क साधून नोकरीचे अामिष देत फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. अशा प्रकारे फसवणूक झाली असल्यास पोलिसांशी संपर्क साधावा. 
- राजेश अाखाडे, वरिष्ठ निरीक्षक 

बातम्या आणखी आहेत...