आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंधन दरवाढ; काँग्रेसकडून वाहनाची अंत्ययात्रा, राष्ट्रवादीचा अाज माेर्चा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- केंद्र सरकारने पेट्राेल, डिझेल, भाजीपाला, कडधान्य यांच्या किंमती वाढवल्या. गेल्या १९२ दिवसांत पेट्राेलचे दर १८ रुपयांनी वाढले अाहेत. यामुळे महागाई वाढणार अाहे, यामुळे पेट्राेलची मूळ किंमत २८ ते ३१ रुपये असताना ८२ रुपये लिटरने विक्री हाेत असून सरकार सर्वसामान्यांची लूट करीत असल्याचा अाराेप नाशिक शहर जिल्हा काँग्रेसने अांदाेलनातून मंगळवारी केला. जिल्हाधिकारी कार्यालयावर वाहनाची अंत्ययात्रा नेली. सर्व कर हटवून पेट्राेल-डिझेलवरदेखील जीएसटी अाकारला जावा अशी मागणीही करण्यात अाली. 


माजी मंत्री शाेभा बच्छाव, काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद अाहेर, महापालिकेतील गटनेते शाहु खैरे, पश्चिम विभागाच्या सभापती डाॅ. हेमलता पाटील, महिला काँग्रेस अध्यक्षा वत्सला खैरे यांच्या नेतृत्वाखाली हे अांदाेलन करण्यात अाले. या सरकारने नाेटबंदी, जीएसटीसारखे अयशस्वी निर्णय घेतल्याने सर्वच घटकांचे व देशाचे प्रचंड नुकसान झाल्याचे फलक कार्यकर्त्यांनी अांदाेलनात फडकवले. माेर्चाच्या शेवटी वैकुंठरथामध्ये स्कूटर ठेवण्यात अाल्याने या अंत्ययात्रेची दिवसभर चर्चा झाली. यावेळी, हनिफ बशीर, वसंत ठाकूर, अार. अार. पाटील, नगरसेविका विमल पाटील, अाशा तडवी, नगरसेवक समीर कांबळे यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते माेठ्या संख्येने उपस्थित हाेते. 


या अाहेत प्रमुख मागण्या 
- सर्व राज्यातील पेट्राेल-डिझेलची किंमत एकसमान असावी. 
- घरगुती गॅसचे दर कमी करावे. 
- जीवनावश्यक वस्तूंचे भाव अाटाेक्यात अाणावे 


अाज अाणि उद्या अांदाेलन 
राष्ट्रवादी काँग्रेस - बुधवारी (दि. ३१) सकाळी ११ वाजता. जिल्हाधिकारी कार्यालय. 
सीटू अाणि भाकप- गुरुवारी (दि. १) दुपारी साडेतीन वाजता, जिल्हाधिकारी कार्यालय 


सामान्यांचे माेडले कंबरडे 
- ७ महिन्यांत पेट्राेल ७.१५, डिझेल ९.३५ रुपयांनी महागले 
- २८ रु. ८० पैसे किमतीच्या पेट्राेलसाठी ८१ रुपये ०९ पैसे 
- एक लिटरसाठी ४८ टक्के कर 
- पेट्रोल जीएसटीत अाणल्यास दर ५० रुपये प्रति लिटरवर येणे शक्य 

बातम्या आणखी आहेत...