आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डीलरशिप देण्याचे अामिष दाखवून दहा लाखांचा गंडा, शहाद्याच्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- फर्टिलायझर कंपन्यांची डीलरशिप मिळवून देण्याचे सांगत शहादा येथे राहणाऱ्या तिघांनी एकाकडून दहा लाख रुपये उकळून फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहिती अाणि विजय अर्जुन पाटील (रा. विश्वधारा को-ऑपरेटिव्ह सोसायटी, एबीबी सिग्नल) यांच्या फिर्यादीनुसार, दोघे संशयित भाऊ विनायक रतिलाल चौधरी, राजेंद्र रतिलाल चौधरी व राखी हरिदास चौधरी (सर्व रा. शहादा, जि. नंदुरबार) यांनी मार्च २०१२ ते ऑगस्ट २०१३ दरम्यान विजय पाटील यांना राष्ट्रीय केमिकल्स फर्टिलायझर व इफको फर्टिलायझर या कंपन्यांची एजन्सी (डीलरशिप) मिळवून देतो, असे सांगत त्यांचा विश्वास संपादन केला. तिघांनी संगनमताने विजय पाटील यांच्याकडून वेळोवेळी रोख स्वरूपात व बॅक खात्यावर पैसे भरून घेतले. 


विजय पाटील यांनी संशयितांनी सांगितल्याप्रमाणे एकूण १० लाख ७५ रुपये त्यांना दिले. मात्र, अनेक महिने उलटूनही फर्टिलायझर कंपनीची डिलरशिप मिळत नसल्याने पाटील यांना संशय आला. त्यांनी संशयितांकडे वेळोवेळी विचारणा करून आपले पैसे परत मागण्याचा प्रयत्न केला. मात्र तिघांनी त्यांना समर्पक उत्तरे न देता त्यांचे १० लाख ७५ रुपये परत केले नाहीत. फसवणूक झाल्याचे विजय पाटील यांच्या लक्षात येताच त्यांनी गंगापूर पोलिस ठाणे गाठत तिघांविरुद्ध फिर्याद दाखल केली. या तिघा संशयितांवर फसवणुकीसह अपहार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस करीत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...