आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकमध्ये 35 लाखांचा गांजा जप्त, शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकची मोठी कारवाई

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- गुन्हे शाखेच्या युनिट एकने पंचवटीतील तपोवन परिसरात लक्ष्मीनारायण मंदिराजवळ मंगळवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास एका आयशर टेम्पोतून 35 लाख रुपयांचा गांजा जप्त केला आहे. जप्त केलेला गांजा आणि टेम्पो असे दोन्ही मिळून सुमारे 50 लाखांचा एेवज आहे. या प्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु आहे. 

 

पंचवटीतील तपोवन परिसरात चोरी छुप्या मार्गाने गांजा विक्रीसाठी आणला जाणार असल्याची माहिती शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकला मिळाली होती. दुपारी लक्ष्मीनारायण मंदिराजवळ एक आयशर संशयास्पदरीत्या उभा असल्याचे पोलिसांना दिसले़ त्यांनी चालकाकडे चौकशी करून टेम्पोची आतून पाहणी केली. यावेळी आत्ता तब्बल 670 किलो गांजा आढळून आला. यांची किंमत सुमारे 35 लाख रुपये आहे. हा गांजा भद्रकाली, आडगाव, पंचवटी आणि म्हसरुळ परिसरात विकला जाणार होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. आडगाव पोलिस या प्रकरणी पुढील अधिक तपास करत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...