आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मावशी रागावल्याने अल्पवयीन मुलीने सोडले घर, तरुणाने मदतीच्या बहाण्याने केला बलात्कार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- मावशी रागवल्याने घर सोडून गेलेल्या राहता येथील अल्पवयीन मुलीवर एका तरुणाने बलात्कार केल्याची घटना सोमवारी घडली. भद्रकाली पोलीस ठाण्यात तरूणाविरोधात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, ती अहमदनगर जिल्ह्यातील राहता येथे मावशी सोबत राहते. तिचे मावस भावांच्या मित्रासोबत प्रेमसंबध आहेत. दोघांना मित्राच्या चुलत्याने एकत्र पाहिल्यानंतर रागावले आणि मावशीलाही समजल्याने ती देखील रागावली. मित्राला फोन करुन विचारले तुझ्या चुलत भाऊ नाशिकला राहतो त्याच्याकडे सोडून देण्यास सांगितले.  काल अखेर ती बस  अहमदनगर व तेथून नाशिक गाडीत बसली. रात्री १० वाजता  सीबीएस स्थानकावर उतरली. मित्राला फोन केला असता तू नाशिकला थांब मी तेथे येतो असे सांगितले. काही वेळाने मावस भावाचा फोन आला. मावशीची बीपी वाढला आहे तु लवकर घरी निघून ये असे सांगितले पण फोनवर बोलत असतांना मोबाईलची बॅटरी संपल्याने फोन बंद पडला. 

 

अनोळखी तरुणाने एकटी पाहून साधला डाव 

सीबीएस बस स्थानकात शिर्डी बसची वाट पाहत असताना एक अनोळखी तरुणाने विचारले ‘तू येथे का थांबली आहेस’ यावर तिने माझा मित्र येणार असल्याचे सांगितले असता मित्रानेच पाठवल्याचे सांगत दुचाकीवर बसवले.  थोड्याच अंतरावर बंद पडलेल्या हॉटेल परिसरात नेले. तोंड दाबून अत्याचार केले.  पीडितेने त्याच्या डोक्यात दगड मारत स्वत:ची सुटका करुन घेत अंधारात लपून बसली. त्यानंतर तेथून पळ काढला आणि पोलिसांना सारी हकीकत सांगितली. जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय  तपासणीमध्ये अत्याचार झाल्याचा अहवालात स्पष्ट झाले आहे.  भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ निरिक्षक मंगलसिंग सुर्यवंशी तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...