आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

द्राक्ष निर्यातीत मागील वर्षाच्या तुलनेत हजार मेट्रिक टनांची वाढ; याेग्य दरही मिळणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड- आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्षबागांचे नुकसान झाले होते. त्यामुळे डिसेंबर महिन्यात निर्यातीवर परिणाम झाला होता. मात्र, जानेवारीच्या सुरुवातीपासून द्राक्ष निर्यातीला पुन्हा चालना मिळाली आहे. २२ जानेवारीपर्यंत नाशिक जिल्ह्यातून ३ हजार ६०० मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात झाली. यामध्ये नेदरलँडमध्ये सर्वाधिक द्राक्षांची निर्यात झाली आहे. गतवर्षापेक्षा जानेवारीपर्यंत १ हजार ५१ मेट्रिक टनाने वाढ झाली आहे. 


गतवर्षी नाशिक जिल्ह्यातील द्राक्षांची चव आंबट असल्याने ग्राहकांनी सपशेल नाकारले होते. त्यामुळे  व्यापाऱ्यांनी नाशिकऐवजी सांगली, सोलापूर जिल्ह्यातील द्राक्ष खरेदीला पसंती दिली होती. यंदा नाशिकच्या द्राक्ष उत्पादकांनी त्यामध्ये सुधारणा करून आकार वाढविण्यापेक्षा चवीला अधिक प्राधान्य दिले आहे. त्यामुळे दर तेजीमध्ये राहण्याची शक्यता आहे. युरोपसह रशिया, थायलंड, चीन, हाँगकाँग, अरब अमिरात या देशांमध्ये निर्यात होत आहे. 

 

दरवाढीची शक्यता कमी
पावसामुळे द्राक्ष झाडावरील घडांची संख्या कमी झाली होती. त्यामुळे कमी राहिलेल्या निर्यातक्षम द्राक्षांची संख्या वाढली. द्राक्ष काढणीच्या वेग वाढल्याने निर्यातीमध्ये ही वाढ झाली आहे. दरात वाढ होण्याची शक्यता कमी राहणार आहे.

- राजेद्र बोरस्ते, उत्पादक व निर्यातदार 

 

असे आहेत सध्याचे दर 

 

युरोप: ६५ ते ७० रू. प्रति किलो 

निर्यात हाेणाऱ्या द्राक्षांना याेग्य दर मिळाला तर स्थानिक बाजारपेठेत द्राक्षांनाही याेग्य दर मिळण्याची शक्यता अाहे.

बातम्या आणखी आहेत...