आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • नाशिक: ओझरमध्ये वादळी वाऱ्यासह दमदार पावसाची हजेरी, शेतक यांना दिलासा Heavy Rain In Ozor, Nashik

नाशिक: ओझरमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी, खरीप पिकांना जीवदान; शेतक-यांना दिलासा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ओझर- दोन आठवड्यापासून गायब झालेला पाऊस सोमवार पासून नाशिक जिल्ह्यात सक्रीय झाला आहे. आज (बुधवार) दुपारच्या सुमारास निफाड तालुक्‍यातील ओझर शहरामध्‍ये पावसाने आगमन केल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. यामुळे खरीपासाठी पेरणी केलेल्या शेतक-यांनाही दिलासा मिळाला आहे.


मध्यंतरी पावसाने दडी दिल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला होता. तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली होती. परंतू पाऊस सक्रीय झाला नसल्याने चिंतेचे वातावरण होते. आठवड्याच्या सुरवातीपासून चित्र बदलले असून सायंकाळच्या वेळी पाऊस बरसत आहे. दरवर्षीप्रमाणे आठवडे बाजारच्या मंगळवारी पावसाने हजेरी लावल्याने खरीपातील सर्वच पिकांना दिलासा मिळाला आहे. सुमारे 30 मिनिटे मुसळधार पाऊस झाल्याने शहरातील काही मुख्य ठिकाणी पाणी साचले होते. पुनरागमन झालेल्या या पावसामध्ये सातत्य राहण्याची अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत. अचानक आलेल्या पावसाने आठवडे बाजारात एकच झुंबड उडाली होती.

 

या पावसामुळे काहीकाळ उन्हापासून नागरिकांना दिलासा मिळाला. मात्र, अनेक भागातील विद्युत पुरवठा खंडित झाल्याने यामुळे नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागला.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, व्हिडिओ...

 

बातम्या आणखी आहेत...