आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशकात शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी स्वतंत्र हेल्पलाइन सुविधा होणार सुरू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी जिल्ह्यात स्वतंत्र हेल्पलाइन सुविधा सुरू केली जाणार अाहे. त्यामुळे नैराश्यग्रस्त शेतकरी अथवा त्यांच्या कुटुंबातील कुठलीही व्यक्ती मदतीसाठी सहज संपर्क करू शकेल. यासाठी आवश्यक संपर्क क्रमांकही लवकरच जाहीर करणार असल्याचे  जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.


 ते म्हणाले, आत्महत्यांची नानाविध कारणे असल्याने आत्महत्या रोखण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे आहे. त्यासाठी प्रशासनाने नैराश्यग्रस्त समस्या जाणून घेण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु हे शेतकरी शोधणे अवघड आहे. त्यामुळे प्रथम हे शेतकरी शोधण्यासाठीचे नियोजन प्रशासन करत आहे. कृषी विभागाच्या मदतीने शेतकऱ्यांची माहिती घेण्यासह आता या शेतकऱ्यांच्या घरापर्यंत जाणार आहोत.  

 

ग्रामपंचायती, स्वयंसेवी संस्थांची मदत घेणार  
नैराश्यग्रस्त शेतकरी शोधणे अवघड असल्याने प्रथम कर्जबाजारी शेतकरी शोधले जाणार आहे. त्यासाठी ग्रामपंचायतींची मदत घेणार आहोत. ग्रामसभांमध्येही हा विषय मांडला जाईल. नैराश्याने ग्रासलेल्या या शेतकऱ्यांना त्यातून बाहेर काढण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेतली जाईल. स्वयंसेवी, समाजसेवी संस्थाचीही मदत घेतली जाईल. त्यातून या शेतकऱ्यांचे वैयक्तिक समुपदेशन केले जाईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...