आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावकारांच्या जाचाला कंटाळून नाशकात पती-पत्नीची आत्महत्या; पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- सावकारी जाचाच्या अनेक घटना समोर येत असताना सावकारी कर्जाला व त्रासाला कंटाळून पती-पत्नीने विषारी औषध सेवन करत आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 


याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वासुदेव अंबादास जाधव (३८, रा. कमल रेसिडेन्सी, अष्टविनायकनगर) लेबर कॉन्ट्रॅक्टरचा व्यवसाय करीत हाेते. व्यवसायासाठी त्यांनी अशोक केदू होळकर, सुनील पूरकर, राहुल जाधव, प्रवीणभाऊ (वेदमंदिर) व अमोल सोनवणे यांच्याकडून व्याजाने पैसे घेतले होते. या सावकारांकडून पैसे परतीसाठी तगादा सुरू होता. सतत होणाऱ्या पैशांच्या मागणीमुळे जाधव व त्यांची पत्नी संगीता जाधव (३४) तणावात होते. काही दिवसांपूर्वीच वासुदेव यांना अपघात होऊन त्यात ते गंभीर जखमी झाले होते; मात्र त्यानंतरही सावकारांकडून रकमेची मागणी होत होती. अखेर या जाचाला कंटाळून दोघांनी शुक्रवारी (दि. १५) दुपारी विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. 


हा प्रकार त्यांचे आतेभाऊ समाधान पवार यांना समजल्यावर त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. याबाबतची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. पोलिसांना घटनास्थळाचा पंचनामा करताना चिठ्ठी आढळून आली. या चिठ्ठीत त्यांनी 'पाच सावकारांकडून पैसे घेतले असून ते वेळोवेळी परत केलेले असताना त्यांनी खोट्या केसेस करण्याबरोबरच मारण्याची धमकी दिली. त्यामुळे तणावात येऊन ही आत्महत्या करीत अाहे', अशा अाशयाचा मजकूर लिहिला अाहे. त्यानुसार अंबड पोलिसांनी या पाचही सावकारांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला अाहे. 

बातम्या आणखी आहेत...