आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकमध्ये ३१८ तर मालेगावमध्ये ५४ अनधिकृत पॅथॉलाॅजी लॅब

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक-किरकाेळ अाजारांपासून तर दुर्धर अाजारांचे अचूक निदान करण्यासाठी अत्यावश्यक अशा रक्त चाचण्यांपासून तर अन्य तपासण्यांसाठी गल्लीबाेळात सुरू झालेल्या पॅथॉलाॅजी लॅबच्या नावाखाली जाेरदार धंदा सुरू झाला अाहे. नाशिकमध्ये ३१८ तर मालेगावमध्ये ५४ लॅब या नियमानुसार एम.डी. पॅथाॅलाॅजिस्ट चालवत नसल्याचे समाेर अाले अाहे. सर्वोच्च न्यायालयाने एम. डी. पॅथॉलाॅजिस्ट अर्हतेच्याच तंत्रज्ञाला पॅथॉलाॅजी लॅब चालवण्यासाठी बंधन घातल्यानंतर अाता या निर्णयानुसार दाेन्ही शहरांतील अनधिकृत ठरलेल्या लॅबवर कारवाईसाठी स्थानिक पातळीवर महापालिका, जिल्हा शासकीय रुग्णालय किंबहुना जिल्हाधिकारी यांसारख्या उच्चतम अधिकाऱ्यांपैकी नेमकी काेणी कारवाई करायची या मुद्यावरून प्रकरण भिजत पडल्याचे दुर्दैवी चित्र अाहे. 

 

जवळपास तीन ते चार वर्षांपासून महाराष्ट्रात अनधिकृत पॅथॉलाॅजी लॅबविराेधात कायदेशीर लढाई सुरू अाहे. नियमानुसार पॅथॉलॉजी या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या अाणि मेडिकल काैन्सिलकडे नाेंदणीकृत असलेल्या डाॅक्टरलाच पॅथॉलाॅजी लॅब सुरू करणे अपेक्षित असल्याचे महाराष्ट्र असाेसिएशन अाॅफ पॅथॉलॉजी अॅण्ड मायक्राेबायाेलाॅजी या संघटनेचे म्हणणे अाहे. दुसरीकडे, डी.एम.एल.टी. व तत्सम अर्हतेच्या तंत्रज्ञांच्या राज्यभरात माेठ्या प्रमाणात लॅब असून त्यांनीही अापल्याला चाचण्यांचे वा लॅब चालवण्याचे अधिकार मिळावे यासाठी संघर्ष चालवला अाहे. या लढाईत सर्वोच्च न्यायालयाने १२ डिसेंबर २०१७ राेजी देशभरातील पॅथॉलाॅजिस्टला दिलासा देणारा निकाल देत एम.डी. पॅथॉलाॅजिस्टशिवाय अन्य काेणालाही लॅब चालवता येणार नाही असा निर्वाळा दिला. त्यानंतर, देशभरातील अनधिकृत लॅबवर कारवाई करण्याचे अाव्हान निर्माण झाले अाहे. महाराष्ट्रात पॅथॉलाॅजी असाेसिएशनने राज्यभरातील महापालिका क्षेत्रात वैद्यकीय विभागाकडून पत्राद्वारे नाेंदणीकृत लॅब किती व ज्यांच्या नावे लॅब अाहे त्या व्यक्तीच्या शैक्षणिक अर्हतेबाबत माहितीही मागवली. त्यानुसार, नाशिक व मालेगाव या दाेन्ही महापालिकांनी महाराष्ट्र असाेसिएशन अाॅफ पॅथॉलॉजी अॅण्ड मायक्राेबायाेलाॅजी या संघटनेला माहिती पाठवली अाहे. त्यात नाशिक महापालिका क्षेत्रात ४५३ पॅथॉलॉजी असून, त्यात फक्त एमडी. पॅथॉलॉजिस्ट १३५ इतके अाहे तर त्याव्यतिरिक्त डी.एम.एल.टी., सी.एम.एल.टी. कडून चालविल्या जाणार्या जवळपास ३१८ पॅथॉलॉजी अाहेत. 


मालेगाव महापालिका क्षेत्रात ६८ पॅथॉलॉजी लॅब नाेंदणीकृत असून त्यात ५४ लॅब या डी.एम.एल.टी., सी.एम.एल.टी. तंत्रज्ञ चालवत अाहेत. येथे केवळ १४ लॅबच पॅथॉलाॅजिस्टमार्फत सुरू अाहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार अाता नाशिक शहर व मालेगाव शहर या दाेन्ही ठिकाणी अनुक्रमे ३१८ व ५४ लॅब अनधिकृत ठरल्या अाहेत. मात्र, या लॅबवर कारवाई काेणी करायची हा मुद्दा भिजत पडला अाहे. पॅथॉलाॅजी असाेसिएशनने दाेन महिन्यांपासून दाेन्ही महापालिका अायुक्तांकडे पाठपुरावा करून बाेगस डाॅक्टरांवरील कारवाईसाठी अस्तित्वात असलेल्या समितीचे अधिकार वापरून कारवाईची मागणी केली अाहे. मात्र, त्याबाबत नियमातील संदिग्धता किंबहुना नाशिक महापालिकेने पॅथॉलाॅजी नाेंदणीपासून तर कारवाईचे अधिकार मिळण्यापर्यंत अाराेग्य उपसंचालकांकडे पाठपुरावा सुरू असल्याचे उत्तर दिल्यामुळे कारवाईचे घाेंगडे भिजत पडले अाहे. 


राज्यभरात माेठ्या प्रमाणात लॅब असून त्यांनीही अापल्याला चाचण्यांचे वा लॅब चालवण्याचे अधिकार मिळावे यासाठी संघर्ष चालवला अाहे. या लढाईत सर्वोच्च न्यायालयाने १२ डिसेंबर २०१७ राेजी देशभरातील पॅथॉलाॅजिस्टला दिलासा देणारा निकाल देत एम.डी. पॅथॉलाॅजिस्टशिवाय अन्य काेणालाही लॅब चालवता येणार नाही असा निर्वाळा दिला. त्यानंतर, देशभरातील अनधिकृत लॅबवर कारवाई करण्याचे अाव्हान निर्माण झाले अाहे. महाराष्ट्रात पॅथॉलाॅजी असाेसिएशनने राज्यभरातील महापालिका क्षेत्रात वैद्यकीय विभागाकडून पत्राद्वारे नाेंदणीकृत लॅब किती व ज्यांच्या नावे लॅब अाहे त्या व्यक्तीच्या शैक्षणिक अर्हतेबाबत माहितीही मागवली. त्यानुसार, नाशिक व मालेगाव या दाेन्ही महापालिकांनी महाराष्ट्र असाेसिएशन अाॅफ पॅथॉलॉजी अॅण्ड मायक्राेबायाेलाॅजी या संघटनेला माहिती पाठवली अाहे. त्यात नाशिक महापालिका क्षेत्रात ४५३ पॅथॉलॉजी असून, त्यात फक्त एमडी. पॅथॉलॉजिस्ट १३५ इतके अाहे तर त्याव्यतिरिक्त डी.एम.एल.टी., सी.एम.एल.टी. कडून चालविल्या जाणार्या जवळपास ३१८ पॅथॉलॉजी अाहेत. 

 

गल्लीबोळात रक्तसंकलन करणारे केंद्र रडारवर 

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार राज्यभरातील दहा हजारांहून अधिक अनधिकृत लॅब बंद होणे अपेक्षित आहे. परंतु, कारवाईत चालढकल का केली जात आहे. लोकांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार आहे. महापालिका क्षेत्रनिहाय अनधिकृत लॅबची माहिती संकलित केली जात असून स्थानिक पातळीवर आयुक्तांकडे पाठपुरावाही केला जाणार आहे. - डॉ. संदीप यादव, अध्यक्ष, महाराष्ट्र असोसिएशन आॅफ प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजिस्ट अ‍ॅण्ड मायक्रोबायोलॉजिस्ट. 

बातम्या आणखी आहेत...