आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारभार त्वरित सुधारा, नाही तर फेरबदल अटळ; मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून कानउघाडणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- नाशिकमध्ये सत्ताधारी भाजपच्या नेत्यांमध्येच अंतर्गत धूसफूस वाढत चालली अाहे. त्याची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिन्ही अामदारांसह महापाैर व पदाधिकाऱ्यांना चांगलाच दम भरला. अापसातील कुरबुरी संपवून त्वरित एकत्र काम केले नाही तर फेरबदल अटळ असतील, अशी तंबीच त्यांनी दिली. मंगळवारी रात्री साडेअकरा वाजता सुरू झालेली या पदाधिकाऱ्यांची बैठक मध्यरात्री सव्वा वाजेच्या सुमारास संपली. या बैठकीत दाेन्ही महिला अामदारांनी शहरात काम करताना अापल्याला विश्वासात घेतले जात नसल्याचा अाराेप केला, तर शहराध्यक्ष तथा अामदार बाळासाहेब सानप यांनी सर्वांना विश्वासात घेऊनच आपण काम करत असल्याचे स्पष्टीकरणही दिले.   


महापालिका निवडणुकीत मुख्यमंत्र्यांनी नाशिक शहर भाजप दत्तक घेत असल्याची घाेषणा केली हाेती. मात्र, मनपावर सत्ता अाल्यानंतरही शहर विकासासाठी अपेक्षित काम हाेत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी अाहेत. भाजपच्या अंतर्गत वादामुळे कामांना गती मिळत नसल्याचेही सांगितले जाते. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी बैठकीत  संघटनात्मक अाढावा घेत सर्वांचीच झाडझडती घेतल्याचे सांगण्यात येते.    


एका हाताने नाही वाजत टाळी  
अामदार देवयानी फरांदे व सीमा हिरे यांनी शहरात काम करताना विश्वासात घेतले जात नाही, अधिकार मिळत नाहीत, अशी थेट तक्रार केली. शहराध्यक्षांकडे त्यांचा राेख असल्यामुळे अामदार सानप यांनी लगेच अापण गटबाजी करत नाही व संघटनेच्या हितासाठीच काम करताे, असे स्पष्टीकरण दिले. जे कार्यकर्ते माझ्याकडे येतात, त्यांची कामे हाेतात, असे त्यांनी सांिगतले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी एका हाताने टाळी वाजत नसल्याचा टाेला लगावला.

 

स्थानिक कार्यकर्ते शांत; नेत्यांमध्येच वाद 
पालकमंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमधील भाजपच्या स्थानिक पातळीवरील परिस्थिती कथन करताना येथे कार्यकर्ते शांत अाहेत, मात्र नेत्यांमध्येच अधिक अस्वस्थता आणि वाद असल्याकडे मुख्यमंत्र्यांचे या बैठकीत लक्ष वेधले. 

 

जेवणाचा गावरान बेत आणि खरपूस समाचारही
मुख्यमंत्र्यांनी निवासस्थानी अालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना प्रथम भाेजनाचे निमंत्रण दिले. शुद्ध शाकाहारी व मऱ्हाटमाेळा असा पिठले- भाकरीचा खरपूस बेत होता. भाकरी व पिठल्यावर पदाधिकाऱ्यांनी ताव मारल्यानंतर तितक्याच खरपूसपणे मुख्यमंत्र्यांनी समाचारही घेतल्याची चर्चा आहे.

बातम्या आणखी आहेत...