आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेच्या बैठकीस ३० नगरसेवकांची दांडी; संजय राऊतांसमाेर नाशिकमध्ये गटबाजी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - विधान परिषद निवडणुकीत दगाफटका नकाे म्हणून अातापासूनच मतदारांमध्ये दिलजमाई करण्याच्या उद्देशाने शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत बुधवारी (दि. २५) बैठक अायाेजित करण्यात अाली हाेती. परंतु या बैठकीला पक्षाच्या ३७ पैकी तब्बल ३० नगरसेवक अाणि महत्वाच्या पदाधिकाऱ्यांनी दांडी मारली. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच शिवसेनेला माेठा धक्का बसला अाहे. विशेष म्हणजे, नवनियुक्त संपर्कप्रमुख भाऊसाहेब चाैधरी यांच्या नाशिकमधील पहिल्याच बैठकीत हा प्रकार घडला.  


शिवसेनेत अलिकडेच संघटनात्मक बदल झाले असून महानगरप्रमुखपदी दाेघांची नियुक्ती करताना संपर्क प्रमुखही बदलण्यात अाले अाहेत. यामुळे गटबाजी कमी हाेण्याएेवजी वाढल्याचेच चित्र अाहे. त्यातच अॅड. शिवाजी सहाणे यांची हकालपट्टी करण्यात अाल्याचा निर्णयही विद्यमान नगरसेवकांसह काही पदाधिकाऱ्यांना जिव्हारी लागला अाहे. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही हकालपट्टी झाली असतानाच दुसरीकडे बाहेरून अालेल्या नरेंद्र दराडे यांना उमेदवारी देऊन ‘रेड कार्पेट’ अंथरण्यात अाले अाहे. परिणामी, गटबाजीला उधाण अाले अाहे. याचा फटका एेन निवडणुकीत बसण्याची शक्यता गृहीत धरीत खासदार राऊत यांच्या उपस्थितीत बैठक बाेलविण्यात अाली हाेती. 

 

ही तर फक्त पदाधिकाऱ्यांची बैठक : संजय राऊत

ही बैठक नगरसेवकांची नव्हे तर पदाधिकाऱ्यांची बैठक हाेती. विधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात बैठक असली तरी स्थानिक स्वराज्य संस्था हा वेगळा मतदारसंघ असताे. त्याचे निकषही वेगळे असतात. या संदर्भात नगरसेवकांची बैठक स्वतंत्र घेतली जाईल. सध्या पक्षाचे २१२ सदस्य स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात अाहेत. मात्र, प्रत्यक्षात चारशे मते पक्षाला मिळतील, अशी सारवासारव खासदार राऊत यांनी केली. 

 

बातम्या आणखी आहेत...