आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुखाेई दुर्घटना : विमानाचे अवशेष गाेळा करणे सुरू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लासलगाव- नाशिक जिल्ह्यातील गोरठाण (ता. निफाड) शिवारात बुधवारी सकाळी सुखोई ३० हे लढाऊ विमान कोसळले होते, सुदैवाने त्या दुर्घटनेत काेणतीही जीवित हानी झाली नव्हती. मात्र, या गावच्या शिवारात विमानाचे अवशेष अस्ताव्यस्त पडले हाेते. दुसऱ्या दिवशी गुरुवारी दिवसभर 'एचएएल'चे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत दुर्घटनाग्रस्त विमानाचे विखुरलेले तुकडे गोळा करण्याचे काम सुरू होते. 


बुधवारी सकाळी तालुक्यातील गोरठाण व वावी परिसरात ओझर येथील येथून उड्डाण घेतलेले लढाऊ विमान कोसळले होते. प्रसंगावधान राखत विमानातील दोन्ही वैमानिक पॅराशूटच्या साह्याने सुरक्षित उतरले होते. ही घटना घडताच तातडीने हवाई दलातील अधिकाऱ्यांची फौज या ठिकाणी दाखल झाली होती. बुधवारपासून वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी या ठिकाणी तपासणी करण्यात व्यग्र हाेते. घटनास्थळी सामान्य नागरिकांना प्रवेशबंदी करण्यात अाली अाहे. तरीही अनेक बघ्यांनी या भागाकडे येण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्यांना मज्जाव केला. 


बुधवारी रात्रभर १०० कर्मचारी दुर्घटनाग्रस्त झालेल्या विमानाच्या भागांचा शोध घेत हाेते. दरम्यान, ज्यांच्या शेतात विमानाचे अवशेष पडले तेथील डाळिंब, द्राक्ष अादी पिकांचे माेठ्या प्रमाणावर नुकसान झाले अाहे. त्यामुळे सरकार या पिकांचे नुकसान भरपाई देणार अाहे की नाही? असा प्रश्न गाेरठाण परिसरातील शेतकऱ्यांकडून विचारला जात अाहे. 


विहिरीत उतरले इंधन 
सुखोई विमान दुर्घटनाग्रस्त झाल्यानंतर ते गोल्डन शिवारातील अशोक निकम यांच्या शेतजमिनीत पहिल्यांदा कोसळले. त्यानंतर परिसरात असलेल्या शेतांमध्ये त्याचे अनेक भाग विखुरले गेले. विमानातील असलेला इंधनाचा साठा परिसरात सांडलेला असल्यामुळे सुखदेव निफाडे यांच्या विहिरीत मोठ्या प्रमाणात इंधन मिसळले असल्याचे स्थानिक शेतकऱ्यांकडून सांगण्यात अाले. तसेच काही शेतकऱ्यांनी अापल्या शेतीतील मातीचे नमुने परीक्षण केंद्रामध्ये तपासणीसाठी पाठवले. 

बातम्या आणखी आहेत...