आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • थरकाप उडवणारे PHOTOS..क्रुझर डिव्हायडरला धडकून शेजारून जाणाऱ्या बसवर आदळली, 5 जागीच ठार 5 Killed In Bus And Car Crash At Nashik Agra Bombay Highway

थरकाप उडवणारे PHOTOS..क्रुझर डिव्हायडरला धडकून शेजारून जाणाऱ्या बसवर आदळली, 5 जागीच ठार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- भरधाव क्रुझर डिव्हायडरला धडकून शेजारुन जाणार्‍या बसवर आदळून झालेल्या भीषण अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये 4 महिलांचा समावेश आहे. मुंबई-आग्रा हायवेवर शिरवाडे फाट्याजवळ आज (शनिवार) हा भीषण अपघात झाला.

 

बस आणि डिव्हायडरला फरफटत गेली क्रुझर...

शिरवाडे फाटयावर क्रुझर डिव्हायडरला धडकली नंतर ती शेजारून जाणाऱ्या बसवर आदळली. बस आणि डिव्हायडरमध्ये क्रुझर फरफटत गेली. बस चालकाने प्रसंगावधान दाखवत बस थांबवली. या अपघातात क्रुझरचा चक्काचूर झाला आहे. अपघातग्रस्त क्रुझर ही बागलाण तालुक्यातील किकवारी येथील आहेत. सर्वजण लग्न समारंभासाठी जात असल्याची माहिती मिळाली आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा... अंगाचा थरकाप उडवणारे PHOTOS....

 

बातम्या आणखी आहेत...