आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काेल्हे दांपत्यासह अमाेल पालेकर, सत्यशील देशपांडे यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा गाेदा गाैरव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक अमाेल पालेकर, गायक, संगीतज्ञ सत्यशील देशपांडे, मेळघाटातील लाेकांसाठी अापलं जीवन व्यतीत करणाऱ्या काेल्हे दांपत्यासह इतर चाैघांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा मानाचा गाेदावरी गाैरव पुरस्कार जाहीर झाला. २१ हजार रुपये, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप अाहे. या पुरस्कारांचे वितरण कुसुमाग्रजांच्या स्मृतिदिनी अर्थात १० मार्च राेजी सायंकाळी ६ वाजता मविप्र संस्थेच्या रावसाहेब थाेरात सभागृहात प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते हाेणार असल्याची माहिती कुसुमाग्रज स्मारकात झालेल्या पत्रकार परिषदेत विश्वस्त अॅड. विलास लाेणारी यांनी दिली. कुसुमाग्रजांच्या संकल्पनेतून १९९२ या वर्षापासून प्रतिष्ठानतर्फे गाेदावरी गाैरव पुरस्कार देण्यात येतात. 

 

यांचा हाेणार गाैरव 
- लाेकसेवा : डाॅ. रवींद्र काेल्हे, स्मिता काेल्हे 
- संगीत-नृत्य : पं. सत्यशील देशपांडे (हिंदुस्थानी संगीत परंपरेचे गाढे अभ्यासक, सृजनशील गायक, प्रतिभावंत रचनाकार अाणि लेखक, संगीतज्ञ ) 
- चित्रपट-नाट्य : अमाेल पालेकर (मराठी-हिंदी चित्रपटसृष्टी, नाट्यसृष्टीतील अभिनेते) 
- चित्र-शिल्प : सुभाष अवचट (अांतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार, ग्राफिक डिझायनर, जाहिरात माध्यम) 
- साहस : सुदर्शन शिंदे, महेश साबळे  (मुंबईत कमला मिलला लागलेल्या अागीतून लाेकांना वाचविण्यात महत्त्वाचा सहभाग.) 
- ज्ञानविज्ञान : डाॅ. स्नेहलता देशमुख  (प्रसिद्ध बालराेगतज्ज्ञ अाणि मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू)

 

यंदाचे पुरस्काराचे चौदावे वर्ष...
- 1992 पासून कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्यावतीने विविध सहा प्रकारांमध्ये उल्लेखनिय कामगिरी करणार्‍या मान्यवरांना ‘गोदा गौरव’ पुरस्कारने सन्मानित केले जात आहे.
- गोदा गौरव पुरस्काराचे यंदाचे चौदावे वर्ष आहे. दर एक वर्षाआड या पुरस्काराचे वितरण होते.

बातम्या आणखी आहेत...