आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संतप्त शेतकऱ्यांनी रस्त्यावर फेकला भाजीपाला...नाशिक-मुंबई महामार्गावर रास्तारोको

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- मुंबई महामार्गावर रास्तारोको, संतप्त शेतकऱ्यांनी रस्त्यावर फेकला भाजीपाला,

नाशिक- घोटी बाजार समिती गावातून बाहेर स्थलांतरीत केल्याने संतप्त शेतकर्‍यांनी रस्त्यावर भाजीपाला फेकत नाशिक- मुंबई महामार्गावर रास्तारोको केला.  

 

बाजारासाठी हक्काची, सोयीची जागा असावी, घोटी बाजार समितीने बाजार समिती स्थलांतरित केली, कुठलीही सूचना न देता बाजार समिती स्थलांतरित केल्याचे कारण देत शेतकरी आक्रमक झाले आहेत.

 

शेतकर्‍यांचे हे आंदोलन तब्बल तीन तास चालले. शेतकऱ्यांच्या या आंदोलनामुळे नाशिक ते सिन्नर रस्ता, सिन्नर ते शिर्डी रस्ता तसेच मुंबई-नाशिक महामार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी झाली आहे. शिवाय कसारा घाटातही वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... शेतकर्‍यांच्या आंदोलनाचे फोटो...

बातम्या आणखी आहेत...