आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांना विठ्ठलाच्या महाआरतीपासून रोखणारच. मराठा क्रांती मोर्चाचा निर्धार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- आषाढी एकादशीनिमित्ताने पंढरपुरात राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विठ्ठलाच्या महाआरती पूजनाचा मान दिला जातो. अनेक वर्षापासून ही परंपरा आहे. परंतु, यावर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आम्ही ही पूजा करू देणार नाही, अशी भूमिका मराठा क्रांती मोर्चाने घेतली आहे. त्यावर ठाम राहून मुख्यमंत्र्यांना रोखण्यासाठी नाशिकसह राज्याच्या सर्वच जिल्ह्यातून नेते व कार्यकर्ते पंढरपूरला जाणार असल्याचे मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

 

सकल मराठा समाजाच्यावतीने गुरूवारी घेण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेत करण गायकर, तुषार जगताप, गणेश कदम यांनी भूमिका मांडली, त्यांच्यासमवेत यावेळी सचिन पवार, शिवाजी मोरे, उमेश शिंदे, ज्ञानेश्वर भोसले यांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते. मराठा समाजाचे अनेक मूलभूत प्रश्न सुटावेत म्हणून संपूर्ण महाराष्ट्रासह इतर राज्यात मराठ्यांचे लाखोंच्या संख्येने तब्बल 58 महामोर्चे काढण्यात आले. त्यात प्रामुख्याने मराठा आरक्षण, शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव, मराठा समाजातील विद्यार्थ्यांना वसतिगृह, स्व. आण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून कर्ज वाटप करून तरूणांना रोजगार, मराठा समाजातील मुलांना फी सवलत, गुणवत्तेच्या आधारावर पदोन्नती, अरबी समुद्रातील शिवस्मारक असे विविध प्रश्न, समस्या, राज्य शासनाच्या समोर मांडण्यात आले. परंतु, त्यातील एकाही मुद्द्यावर राज्य शासनाने ठोस निर्णय घेतला नसल्याकडे या पदाधिकाऱ्यांनी लक्ष वेधले.

 

बातम्या आणखी आहेत...