आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

व्हेंटिलेटरमध्ये झुरळ, उपचारा दरम्यान गुदमरून महिलेचा मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 नाशिक - नाशिकच्या आडगाव मेडिकल कॉलेजमध्ये रविवारी रात्री विष प्राशन केलेल्या महिलेला लावलेल्या व्हेंटिलेटरमध्ये झुरळ आढळले. यामुळेच तिचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे.

 

 रुग्णालय प्रशासनाने या आरोपांचे खंडन केले. अंजली शंकर बैरागी (४२, रा. हिरावाडी) यांच्यावर १७ एप्रिलपासून आयसीयूत उपचार सुरू होते. रविवारी रात्री मुलगा धीरज याने आई प्रतिसाद देत नसल्याने डॉक्टरांसह नर्सना बोलावले. मात्र, कुणी आले नाही म्हणून त्याने व्हेंटिलेटर लावायला घेतला तेव्हा त्यात झुरळ दिसले. रुग्णालय प्रशासनानुसार, महिलेची प्रकृती दाखल करतानाच गंभीर होती. आयसीयूत उपचार सुरू करण्यापूर्वी रुग्णाला नेहमी नवी व्हेंटिलेटर किट वापरली जाते. 

बातम्या आणखी आहेत...