आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावकारी कर्जाला कंटाळून नाशिकमध्ये दाम्पत्याची विषारी औषध प्राशन आत्महत्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- सावकारी कर्जाला कंटाळून दाम्पत्याने विषरी औषध प्राशनकरून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कामटवाडे परिसरातील केवल पार्क येथे शुक्रवारी ही घटना घडली. 

 

संगीता जाधव आणि वासुदेव जाधव अशी आत्महत्या केलेल्या दोघांची नावे आहेत.  वासुदेव जाधव हे शिरपुर तालुक्यातील (जि. धुळे) भोरटेक येथील रहिवासी होते. त्यांचे मृतदेह मूळ गावी पाठविण्यात आले आहेत.

 

सावकारी कर्जामुळे जाधव दाम्पत्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा परिसरात सुरु आहे. याप्रकरणी संबंधित सावकारावर अंबड पोलिसांत गुन्हा दाखल झाल्याचे समजते.

 

बातम्या आणखी आहेत...