आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डीएसकेंचे अख्ख कुटुंबच तुरुंगात अ‌न‌् पुणे विद्यापीठाकडून FY B.Com ला यशोगाथेचा धडा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- गुंतवणूकदारांची अार्थिक फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी कुटुंबासह सध्या तुरुंगात अाहेत. तरीही त्यांची यशाेगाथा सांगणारा 'वास्तू उद्याेगातील अग्रणी डी. एस. कुलकर्णी' या शीर्षकाने एफवाय बीकाॅमच्या पुस्तकात धडा असल्याने शिक्षकांना शिकवताना अडचणी निर्माण हाेत अाहेत, तर विद्यार्थीही अशा व्यक्तीचा अादर्श ठेवावा का, असा प्रश्न विचारत अाहेत. दरम्यान, संभाजी ब्र्रिगेडने देखील हा धडा अभ्यासक्रमातून वगळावा, अशी मागणी विद्यापीठाच्या कुलगुरूंकडे केली आहे. 


सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रथम वर्ष वाणिज्य अर्थात एफवाय बीकाॅमच्या यशाेगाथा या मराठी पुस्तकात 'वास्तू उद्याेगातील अग्रणी डी. एस. कुलकर्णी' असा एक धडा देण्यात अाला अाहे. गेल्या वर्षभरापासून डीएसके यांचे प्रकरण सुरू अाहे. त्यांच्यासह कुटुंबीयांना तुरुंगातही जावे लागले अाहे. असे असतानाही वेळाेवेळी अभ्यासक्रमात बदल करणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून या पुस्तकात अद्याप बदल का करण्यात आले नाहीत? २०१३ पासून हे पुस्तक अभ्यासक्रमात अाहे. गेल्या वर्षी नाहीतर किमात यंदा तरी त्यात बदल हाेईल, अशी अपेक्षा असताना अद्यापही त्यात का बदल झाला नाही, असा प्रश्न नाशिक शहरातील विद्यार्थी अाणि शिक्षकांकडून उपस्थित केला जात अाहे. 


नाव न छापण्याच्या अटीवर शिक्षक म्हणतात... 
शहरातील एका प्रथितयश महाविद्यालयातील शिक्षक म्हणाले की, अाता अभ्यासक्रमात अाहे म्हणून अाम्हाला शिकवावे लागणारच अाहे. पण वर्षा-दरवर्षाला अभ्यासक्रमात बदल करणाऱ्या विद्यापीठाच्या धुरीणांनी हा बदल किमान अाता तरी करायला हवा हाेता. सध्या डी.एस. कुलकर्णी यांच्या बातम्या सर्वत्र सुरू अाहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या सध्याच्या परिस्थितीबद्दलच माहिती अाहे. 


यांचा अादर्श ठेवायचा का? 
माझे नाव छापू नका, नाही तर मला नापास करतील असे म्हणत काॅलेज राेडवरील एका महाविद्यालयातील विद्यार्थी म्हणाला की, यशाेगाथा काेणाचीही असाे, त्या प्रेरणेने अापण माेठे हाेत असताे. डीएसके यांची यशाेगाथा अापण नाकारत नाहीच. पण हे यश शेवटपर्यंत टिकवताही अाले पाहिजे. मग यांचा अादर्श अाम्ही ठेवायचा का, असा सवालही या विद्यार्थ्याने केला. 

 

यांच्याबरोबर आहे डी.एस.केंचा धडा
यशोगाथा या पुस्तकाची प्रस्तावना डॉ. प्र. चिं. शेजवलकर यांनी लिहिलेली असून या पुस्तकात डॉ. श्रीराम लागू, लता मंगेशकर, डॉ. राम ताकवाले, डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. ह. वि. सरदेसाई, डॉ. विजय भटकर, बालाजी तांबे, सिंधुताई सपकाळ, डॉ. हुकमीचंद व कममल चोरडिया, फादर फ्रान्सिस दिब्रिटो, सचिन तेंडुलकर.

 

बातम्या आणखी आहेत...