आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाचव्या मजल्यावरून मुलगी अंगावर पडल्याने पित्याचा मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड- डीजेच्या गाण्याच्या तालावर सुरू असलेला हळदीचा कार्यक्रम, एकीकडे नाचगाणे तर दुसरीकडे जेवणाच्या उठणाऱ्या पंगती... नवरीची चुलतबहीण इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून हळदीच्या या कार्यक्रमाचा आनंद घेत होती... सामनगावराेडवरील जयप्रकाशनगरात असा हा अानंद साेहळा सुरू असताना नियतीच्या मनात काही वेगळेच हाेते. अचानक पाचव्या मजल्यावरून हा कार्यक्रम पाहणाऱ्या चुलतबहिणीचा तोल गेला आणि ती खाली पडली ती तिला वाचवण्यासाठी पुढे सरसावलेल्या वडिलांच्या अंगावरच. गंभीर गखमी झालेल्या वडिलांचा यात अंत झाला. तर मुलगी गंभीर जखमी झाली. तिला बिटकाे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात अाले. यामुळे लग्नसाेहळ्यावर दु:खाचे सावट पडले. 


सामनगावरोडवरील जयप्रकाशनगरातील अश्विनी काॅलनी येथे गुरुवारी (दि. २६) रात्री १०.३० वाजेच्या सुमारास हळदीचा समारंभ सुरू होता. यावेळी चुलतबहिणीचा हळदीचा कार्यक्रम असल्याने इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून आठवीत शिक्षण घेणारी सुनंदा विजय गोदडे (१६) ही या कार्यक्रमाचा आनंद घेत होती. मात्र, अचानक तोल गेल्याने ती खाली पडली. ती पडत असताना उपस्थितांनी आरडाअोरड केल्याने तेथे खाली उभे असलेले तिचे वडील विजय किसन गोदडे (३८) हे तिला वाचविण्यासाठी पुढे धावले अाणि त्यांच्या डाेक्यावरच सुनंदा पडली. यात मुलगी अाणि वडील जखमी झाले. वडिलांना गंभीर दुखापत झाल्याने ते बेशुद्ध पडले. त्यांना उपचारासाठी बिटको रुग्णालयात दाखल केले. नंतर जिल्हा रुग्णालयात नेण्यात अाले. मात्र, त्यांचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी घाेषित केले. जखमी मुलीवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अचानक घडलेल्या घटनेमुळे विवाहासारख्या आनंदाच्या कार्यक्रमावर दु:खाचे सावट पसरलेे. विजय गोदडे यांच्यावर शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, दोन मुले असा परिवार आहे. 

 

विवाहसाेहळ्यावर दु:खाचे सावट 
इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून अापल्या चुलतबहिणीच्या हळदीचा कार्यक्रम पाहताना सुनंदा ताेल जाऊन खाली वडीलांच्या डाेक्यावर पडली. यात वडिलांचा मृत्यू झाल्याने या विवाह साेहळ्यावर दु:खाचे सावट पसरले. यात गंभीर जखमी सुनंदावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू अाहेत. तर तिचे वडील विजय गाेदडे यांच्यावर शुक्रवारी शाेकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात अाले. 

बातम्या आणखी आहेत...