आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Earthquake: गोंदे-भायगाव परिसर पुन्हा भूकंपाने हादरला, आठ दिवसांत दुस-यांदा हा धक्का

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- पेठ तालुक्यातील गोंदे-भायगाव परिसराला पुन्हा मंगळवारी (दि.17) सकाळी 8 वा. 48 मिनीटांनी 2 रिश्टर स्केलचा भुकंपाचा धक्का बसला. आठ दिवसात दुस-यांदा हा धक्का बसल्याने नागरीकात भीतीचे वातावरण आहे. याची माहिती मिळताच पेठचे तहसिलदार हरिष भामरे यांनी तलाठी मंडल अधिकारी यांच्यासह भेट देऊन परिसरातील नागरीकांनी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.


गोंदे-भायगाव परिसर मागील मंगळवारी सकाळी 2.7 रिश्टर स्केलच्या भूकंपाने हादरल्यानंतर मंगळवारी पुन्हा 2 रिश्टर स्केलचा भुकंपाचा धक्का 32 सेकंद जाणवल्यानंतर परिसरातील नागरीकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. मात्र तहसिलदार हरिष भामरे यांना माहिती मिळताच त्यांनी मंडल अधिकारी दळवी तलाठी मुळे यांच्यासह भेट दिली त्यावेळी  पोलीस पाटील शाम भोये, सरपंच सौ. सुनिता माळगावे, ग्रामसेविका श्रीमती चौधरी, सदस्य हरिदास भोये, पंकज माळगावे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते या परिसराला जवळपास मागील 20 वर्षांपासुन अशा प्रकारचे हादरे बसत असुन त्यावर शासनाने त्या ठिकाणी खबरदारी म्हणून भूकंपाची पुर्वकल्पना देण्याचे यंत्र बसविण्याची  मागणी  केली, त्यावेळी तहसिलदारांनी तेथील विहीर जिचे पाणी  कितीही मोटर लावुन काढण्याचा प्रयत्न केला तरीही पाणीपातळी कमी होत नाही व कितीही पाऊस पडला तरीही पाणीपातळी वाढत नाही तसेच त्या विहीरीतील पाणी स्वच्छ राहाते त्यास तहसिलदारांनी भेट दिली व नागरीकांच्या भावना शासनापर्यंत पोहचविण्याची ग्वाही दिली. आज झालेला भूकंप हा 2 रिश्टर स्केलचा 34 सेकंद व त्याचा केंद्रबिंदु नाशिकपासून 32 किमी अंतरावर असल्यची नोंद झाल्याचे मेरीच्या भूकंपमापन केंद्रातून सांगण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...