आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनकाई किल्यावर आग 25 हेक्टरवरील वनसंपदा जळून खाक, अनेक प्राणीही भक्षस्थानी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- मनमाड-येवला राज्यमार्गावर अनकाई अगस्ती किल्ल्यावर आज (मंगळवार) सकाळी 8 वाजेच्या सुमारास अचानक मोठ्या प्रमाणावर आग लागून सुमारे 20 ते 25 हेक्टर क्षेत्रावरील वाळलेला चारा, झाडे, व वन्यसंपदा जळून खाक झाली. अनेक वन्य प्राणीही या आगीच्या भक्षस्थानी पडले आहे. ही आग अवघड ठिकाणी लागल्यामुळे अग्निशमन वाहन तेथपर्यंत पोहचू शकले नाही. परिणामी दुपारपर्यंत शासकीय यंत्रणा आणि ग्रामस्थ ही आग विझवण्याचा आटाेकाट प्रयत्न करत होते. आगीचे निश्चित कारण समजू शकले नाही.

 

अगस्ती डोंगराच्या मनमाडकडील बाजूकडे सकाळी 8 वाजेच्या सुमारास अचानक आग लागली आणि मोठ्या प्रमाणावर धुराचे लोळ दिसू लागले. सुमारे 20 ते 25 हेक्टर क्षेत्रावर ही आग पसरली. ज्यामध्ये चारा, झाडे, वन्य प्राणी पक्षी यांचे मोठे नुकसान झाले. आग लागल्याचे निर्दशास येताच अनकाई ग्रामस्थ व वनविभागाचे कर्मचारी, या विभागात किल्ला संवर्धन मोहीम राबवणारे कार्यकर्ते आदिंनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्याचा आटाेकाट प्रयत्न केला. ग्रामस्थ मोठ्या संख्येने या मदतकार्यात सहभागी झाले होते. कोणीतरी अज्ञात इसमान जळती काडी फेकल्याने ही आग लागल्याचे समजते.

 

बातम्या आणखी आहेत...