सिन्नर- घोटी महामार्गावर / सिन्नर- घोटी महामार्गावर गॅस टँकर-कंटेनरची भीषण धडक; गॅस गळतीनंतर आग

सिन्नर-घोटी महामार्गावर पांढुर्ली शिवारात पेट्रोल पंपाजवळील वळणावर गॅस टँकर आणि कंटेनरमध्ये भीषण धडक झाली. अपघातात टँकरमधील गॅस गळती झाल्याने आग भडकली.

Aug 06,2018 02:23:00 PM IST

सिन्नर- सिन्नर-घोटी महामार्गावर पांढुर्ली शिवारात पेट्रोल पंपाजवळील वळणावर गॅस टँकर आणि कंटेनरमध्ये भीषण धडक झाली. अपघातात टँकरमधील गॅस गळती झाल्याने आग भडकली. ही घटना सोमवारी सव्वा अकराच्या सुमारास घडली.

घटनास्थळी पोलिस व अग्निशामक दलाचे जवान दाखल झाले आहेत. टँकरने पेट घेतल्याने आगीचे मोठे लोळ दिसत आहेत. त्यात एक दुचाकी जळल्याचे समजले. या आगीत अन्य वाहने पेटल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

खबरदारी म्हणून महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. सिन्नर- घोटी महामार्गावर वाहतुक मोठ्या प्रमाणात सुरू असते. त्यामुळे खबरदारी म्हणून रस्ता बंद करण्यात आला आहे. त्यामुळे दोन्हीबाजूकडे वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा संबंधित घटनेचे फोटो...

X