आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक- बिटको कॉलेजसमोर गुरुवारी पहाटे 5 वाजेच्या सुमारास हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीचा गॅस टँकर उलटला. टँकर मुंबईहुन सिन्नरच्या दिशेने निघाला होता. टँकरमध्ये साडे सतरा टन गॅस होता. गॅस गळतीची भीती व्यक्त केली जात होती. परंतु तसे झाले नाही. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. क्रेनच्या मदतीने रस्त्यावर आडवा झालेला टॅंकर हटविण्यात आला आहे.
चालक जखमी
या अपघातात टँकरचा चालक जखमी झाला आहे. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक बिटको चौकापासून वळविण्यात आली आहे. स्पीडब्रेकरमुळे टँकर उलटल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा... अपघाताचे फोटो...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.