Home | Maharashtra | North Maharashtra | Nashik | Maratha Reservation Agitation in Ozar Front of MLA Anil Kadams Office

आमदार अनिल कदम यांच्या कार्यलयावर मराठा आंदोलकांचा ठिय्या; विधिमंडळात ठामपणे बाजू मांडावी

प्रतिनिधी | Update - Jul 31, 2018, 03:59 PM IST

मराठा समाजाला आरक्षणासह विविध मागण्यांसाठी सकल मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी निफाडचे आमदार अनिल कदम यांच्या ओ

 • Maratha Reservation Agitation in Ozar Front of MLA Anil Kadams Office

  ओझर- मराठा समाजाला आरक्षणासह विविध मागण्यांसाठी सकल मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी निफाडचे आमदार अनिल कदम यांच्या ओझर येथील कार्यालयावर मंगळवारी सकाळी ठिय्या आंदोलन केले. मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, या मागणीकडे शासन गांभीर्याने लक्ष देत नसल्याने शासनाचा निषेध करण्यात आला. यावेळी करण गायकर, योगेश मिसाळ, गणेश कदम, अमोल शिंदे आदिंनी एक दिवसाच्या आंदोलनासाठी मराठा समाजाला जिल्हाधिकाऱ्यांनी जागा उपलब्ध करून न दिल्याने निषेध व्यक्त केला.

  मागील 10 वर्षांपासून कदम हे निफाड मतदार संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. या गोष्टीची जाणीव ठेवून मराठा समाज कदम यांच्या पाठिशी उभा राहील, असे सांगत आंदोलनकर्त्यांनी मराठा समाजासाठी निफाड मतदार संघात अद्यावत मराठा भवन अभ्यासिका उभी करावी, अशी मागणी केली.

  यावेळी ठिय्या आंदोलनामध्ये समन्वय समितीचे करण गायकर यांनी आपल्या मनोगतात शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करीत जिल्हाधिकारी यांनी आंदोलनास जागा दिली त्या बाबत एकही लोकप्रतिनिधीनी आवाज उठवला. याची खंत व्यक्त करीत राज्य सरकारने तातडीने मराठा आंदोलना बाबत आपली भूमिका जाहीर करण्याची मागणी केली.

  जिल्हा समन्वयक उमेश देशमुख यांनी मराठा समाज भीक मागत नाही तर हक्क मागत असल्याचे सांगत आमदार अनिल कदम यांनी मराठा समाजाची विधिमंडळ अधिवेशनात ठामपणे बाजू मांडावी, अशी मागणी केली. तुषार जगताप यांनी सरकार फसव्या घोषणा करीत असल्याची टीका केली शिवसेना तालुका प्रमुख सुधीर कराड यांनी शिवसेना सकल मराठा समाजाच्या खांद्याला खांदा लाऊन आंदोलनात काम करणार असल्याचे सांगितले. यावेळी वसंत गवळी सतीष नवले, गणेश कदम, यांनी आपल्या मनोगतात सकल मराठा समाजाला न्याय देण्याची मागणी केली यावेळी सुभाष होळकर, अशोक निफाडे, दशरथ रूमणे, उपसरपंच सागर शेजवळ पंचायत समिती सदस्य पंडीतराव आहेर, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश महाले, संजय पगार, सतीष नवले, प्रशांत पगार नितिन काळे,विशाल मालसाने, अमित कोळपकर, सतिष पगार, विक्रम शेजवळ आदी उपस्थित होते.

  गुन्हे मागे घेण्यासाठी कदम यांच्याकडून निवेदन..
  आमदार अनिल कदम यांच्याकडून मागील आठ दिवसांपासून चालू असलेल्या मराठा आंदोलनात विद्यार्थ्यांवर व निरपराध लोकांना खोटे गुन्हे दाखल झाले आहेत.खोटे गुन्हे दाखल झाल्यामुळे त्यांच्या शैक्षणिक कारकीर्द धोक्यात येत आहे. तरी विद्यार्थ्यांवर व निरपराध लोकांवर दाखल झालेले खोटे गुन्हे माघे घेण्याचे आदेश द्यावेत व खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या पोलिसांना निलंबित करण्याचे आदेश द्यावे असे या पत्रात म्हंटले आहे. यावेळी निफाड तहसीलदार दीपक पाटील व उपअधीक्षक अतुल झेंडे यांना निवेदन देण्यात आले.

  पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... ओझरमधील मराठा क्रांती मोर्चाच्या ठिय्या आंदोलनाचे फोटो...

 • Maratha Reservation Agitation in Ozar Front of MLA Anil Kadams Office
 • Maratha Reservation Agitation in Ozar Front of MLA Anil Kadams Office

Trending