आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक- तब्बल दोन महिन्यानंतर अनैतिक संबधातून केलेल्या खूनाच्या गुन्ह्याला वाचा फुटली आहे. दोन महिन्यापासून बेपत्ता असलेली युवती मखमलाबाद गावातील असून येथील एका विवाहीत मंडप व्यावसायिकाशी तिचे प्रेमसंबध होते. लग्नासाठी तगादा लावल्याने मंडप बांधण्याच्या लोखंडी खुटा डोक्यात टाकून तिचा खून केल्याचे तपासात उघडकीस आले. 27 नोव्हेंबर 2017 ला पेठरोडवरील आंबेगन शिवारातील एका तलावात प्लास्टीकच्या गोणी हातपाय बांधलेले मृतदेह आढळून आला होता.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर महिन्यात पेठरोडवरील आंबगेण शिवारात तळ्यात एक युवतीचा मृतदेह अढळून आला होता. तिच्या कमरेला असलेल्या पट्ट्यावर ‘मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक बहुजन हिताय बहुजन सुखाय’ एवढीच माहिती पोलिसांना मिळाली होती. यामाहितीच्या अधारे पोलिस अधिक्षक संजय दराडे, अपर अधिक्षक विशाल गायकवाड, यांनी घटनास्थळी पाहाणी करत तपास सुरु केला होता. अधिक्षक दराडे यांनी विशेष पथकाला तपासाच्या सुचना करत जिल्ह्यातील सर्व मविप्रच्या शाळामध्ये येत नसलेल्या अथवा बेपत्ता असलेल्या मुलींचा तपास सुरु केला. मात्र काहीच ठोस माहिती हाती लागली नाही. अखेर मखमलाबाद गावातील एक युवती दोन महिन्यापासून गावात दिसत नसल्याची माहिती मिळाली.
शेवटचा पर्याय म्हणून पथकाने गावातील गंगानाथ झा यांच्याकडे चौकशी केली. मात्र ती गुजरात सासरी गेल्याची माहिती त्यांनी दिली. अखेरचा प्रयत्नही अयशस्वी होत असल्याने पथक हताश झाले. मात्र घराबाहेर पडतांना मविप्र शाळेचा गणवेश बाहेर सुखत असतांना याबाबत विचारणा केली. काही दिवसांपूर्वी बेल्ट हरवल्याची माहिती झा यांच्या लहान मुलीने दिल्यानंतर पथकाला आणखी एक धागा सापडला.
पत्नी सोडून गेल्याच्या रागातून त्याने प्रेयसीला संपवले... पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, नेमके काय आहे हे प्रकरण?
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.