आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संभाजी भिडेंना आंबे महागात पडणार अन‌् मनूही भोवणार; हायकोर्टात याचिका दाखल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- 'अांबे खाल्ल्याने मुले हाेतात' अाणि 'संत ज्ञानेश्वर, तुकारामांपेक्षाही मनू श्रेष्ठ' ही वादग्रस्त वक्तव्ये करणाऱ्या संभाजी भिडेंविराेधात मुंबई उच्च न्यायालयात अॅड. नितीन सातपुते यांनी याचिका दाखल केली असून, त्यात भिडेंना भाषणे करण्यावर घटनात्मक प्रतिबंध घालावा, अशी मागणी करण्यात अाली अाहे. भिडेंचे वादग्रस्त वक्तव्य हे घटनेने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यातील तरतुदींचा भंग करत असल्याचे याचिकाकर्त्याने म्हटले अाहे. 


वाशी तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या शेतातील अांब्याचे फळ खाल्ले तर ज्यांना मुलं हाेत नाही त्यांना मुलं हाेतात, असा चमत्कारिक दावा शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे यांनी जून महिन्यात नाशिकमध्ये केला हाेता. हे विधान गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व लिंग निवडीस प्रतिबंधक कायद्यातील तरतुदीलाच अाव्हान देणारे असल्याचे सांगत गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व लिंग निवडीस प्रतिबंधक कायदा समितीचे सदस्य गणेश बाेऱ्हाडे यांनी कुटुंबकल्याण कार्यालयाच्या अतिरिक्त संचालिका अर्चना पाटील यांच्याकडे तक्रार केली हाेती. अशा प्रकारे वक्तव्य करणे म्हणजे गर्भलिंगनिदान कायद्याच्या कलमांचा भंग अाहे. भिडे यांनी असे वक्तव्य करून कायद्याचा भंग केला असल्याने त्यांच्याविरुद्ध याेग्य न्यायालयात गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही पत्रात करण्यात अाली. 


कुटुंबकल्याण विभागाने नाशिक महापालिकेच्या वैद्यकीय अाराेग्याधिकाऱ्यांना जिल्हा समुचित प्राधिकारी या नात्याने भिडे यांच्या वक्तव्याबाबत खातरजमा करून त्यांच्यावर याेग्य ती कार्यवाही करावी, अहवाल तत्काळ कार्यालयास सादर करावा, असे अादेशित केले. त्यानुसार महापालिकेने चाैकशी सुरू केली अाहे. त्यासाठी भिडे गुरुजी यांना नाेटीस पाठवण्यात अाली. मात्र, नाेटीस देऊन पंधरा दिवस उलटूनही त्यास उत्तर देण्यात अाले नाही. पुणे येथे पालख्यांचे दर्शन घेण्यासाठी उपस्थित असलेले भिडे यांनी सांगितले की, गावपातळीपासून संघटनात्मक बांधणी करून आपल्या हजारो अनुयायांना आपल्या मार्गावर चालायला शिकवणारा मनू हा संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वरांपेक्षाही श्रेष्ठ होता.

 
गर्भलिंगनिदान कायद्यातील कलमांचा भंग 
या धक्कादायक विधानांच्या विराेधात भिडे गुरुजींवर अॅड. सातपुते यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली अाहे. अांबे खाणाऱ्याला मुले हाेतात या वक्तव्याने गर्भलिंगनिदान कायद्यातील कलमांचा भंग केला अाहे. मनूशी संबंधित विधान हे लाेकांच्या धार्मिक भावना बिघडवणारे अाहे. भारतीय घटनेने अभिव्यक्ती स्वातंत्र देताना काही बंधनेही घालण्याची तरतूद केली अाहे. भिडेंचे वक्तव्य या तरतुदींचा भंग करणारे अाहे. त्यामुळे त्यांच्या भाषणांवर घटनात्मक प्रतिबंध घालावा, अशी मागणी मी याचिकेद्वारे केली अाहे.
- अॅड. नितीन सातपुते, याचिकाकर्ते 

 

बातम्या आणखी आहेत...