आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवजयंती बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणार्‍या छिंदमची तुरुंगातून सुटका, अज्ञातस्थळी रवाना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक/अहमदनगर- छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल तुरुंगात असलेला नगरचा माजी उपमहापाैर श्रीपाद छिंदमची मंगळवारी न्यायालयाने जामिनावर सुटका केली. त्यानंतर तो अज्ञातस्थळी रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. वादग्रस्त वक्तव्यानंतर भाजपने छिंदमची पक्षातून व उपमहापाैरपदावरून हकालपट्टी केली हाेती.  


छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अाक्षेपार्ह वक्तव्य करणे तसेच सरकारी कामात अडथळा आणणे असे दोन गुन्हे छिंदमवर दाखल आहेत. त्याची नाशिक रोड कारागृहात रवानगी करण्यात आली होती. दोन्ही गुन्ह्यांत अहमदनगर सत्र न्यायालयाने शुक्रवारी (दि. ९) छिंदमला १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला होता. आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर त्याला मंगळवारी (दि. १३) दुपारी सोडण्यात आले. 

 

अहमदनगर न्यायालयाच्या पत्रानंतर मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहातून छिंदमला सोडण्यात आलेे. या वेळी कारागृहाबाहेर छिंदमचे दोन-तीन नातेवाईक उपस्थित होते. कारागृहाबाहेर जिवाला धोका असल्याने छिंदमने पोलिस संरक्षण मागितले होते. त्यानुसार त्याला नाशिक रोड पोलिसांनी सिन्नर हद्दीपर्यंत, तर त्यानंतर ग्रामीण पोलिसांनी बंदोबस्तात अहमदनगरकडे रवाना केले.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा... काय आहे प्रकरण? व्हिडिओ प्रसारित होताच उसळला होता जनक्षोभ...

बातम्या आणखी आहेत...