आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘एसटी’चे कामगार पुन्हा अांदाेलन करणार; वेतनवाढीसाठी सहकुटुंब माेर्चा, संपाचाही इशारा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- उच्चस्तरीय समितीने एसटी कामगारांसाठी केलेली वेतनवाढीची शिफारस अत्यल्प आहे, असा आरोप करत एसटी कामगार संघटनांनी शुक्रवारी पुन्हा संपाचा इशारा दिला. एसटी कामगार ९ फेब्रुवारी रोजी मुंबईत कुटुंबासह आक्रोश मोर्चा काढणार असून त्यामध्ये संपाची तारीख निश्चित केली जाणार अाहे, तसेच २५ जानेवारी रोजी राज्यभर समितीच्या शिफारशींची होळी करण्याचा इशारा संघटनेने दिला.   


आॅक्टोबरमध्ये राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा ५ दिवसांचा संप झाला होता. त्या वेळी झालेल्या वाटाघाटीत सरकारने १,०७६ कोटींच्या वेतनवाढीचा प्रस्ताव एसटी कामगार संघटनांपुढे ठेवला होता. मात्र, संघटनांनी तो फेटाळून लावला होता. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशाने यावर तोडगा काढण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने वेतनवाढीसंदर्भातील शिफारशींचा अहवाल न्यायालयास दिला आहे. त्याला कर्मचाऱ्यांचा विरोध आहे. ९ फेब्रुवारी राज्यभरातील एसटी कामगार त्यांच्या कुटुंबीयांसह मुंबईत आक्रोश मोर्चा काढणार आहेत. त्या मोर्चात संपाची तारीख निश्चित केली जाणार आहे. मुंबईत झालेल्या बैठकीला इंटकचे अध्यक्ष व माजी आमदार जयप्रकाश छाजेड, हनुमंत ताटे, संदीप शिंदे, राजू भालेराव, अजय गुजर आणि प्रमोद पोहरे आदी नेतेमंडळी हजर होती.  
 
अहवालाची करणार होळी
उच्चस्तरीय समितीच्या शिफारशी अन्याय कारक असल्याने या समितीचा अहवालाची होळी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 25 जानेवारी रोजी राज्यातील सर्व डेपोमध्ये या अलवाहाची होळी करून निषेध व्यक्त केला जाणार आहे.

 

आता थेट मुंबईत आक्रोश मोर्चा...
एसटी कामगारांच्या वेतनाबाबत एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. एसटी कामगारांचा प्रश्नाबाबत कुटूंबियासह मुंबईत 9 फेब्रुवारी रोजी मुंबईत आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.या मोर्चा मातोश्रीवर नेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वेतनवाढीसंदर्भात निर्णय घेण्याबाबत साद घातली जाणार आहे. 

 

एसटी कामगारांना अर्थिक र्स्थेय प्राप्त करण्यासाठी एसटी कामगार संघटना प्रयत्न करत आहेत. दोन वर्षापूर्वी  वेतन करार करतांना सातवा वेतन आयोगानुसार  केला जाईल,अशी भूमिका जाहीर केली आहे. संघटनेचे प्रशासनाकडे याबाबत सविस्तर माहिती दिली होती.एसटी कर्मचा ऱ्यांना सातवा  वेतन आयोग लागू करण्याची मागणी कायम आहे.
- हनुमंत ताटे, जनरल सेक्रेटरी, एसटी कामगार संघटना

बातम्या आणखी आहेत...