आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकर्‍यांनो सावधान! उत्तर महाराष्ट्रावर गारपिटीचे सावट; हवामान विभागाचा इशारा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- मराठवाडा आणि विदर्भ पाठोपाठ आता उत्तर महाराष्ट्रावरही अवकाळी पाऊस आणि गारपिटीचे सावट निर्माण झाले आहे. येत्या 23 फेब्रुवारीदरम्यान नाशिकसह, अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात जोरदार पावसासह गारपीट होईल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या इशाऱ्यानंतर नाशिकसह जळगाव जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे.

 

पिकांची काळजी घ्या... प्रशासनाचे आवाहन

शेतकऱ्यांनी कापलेल्या पिकांची काळजी घ्या, पिके उघड्यावर सोडू नका, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. 

 

मराठवाड्यासह विदर्भात गारपिटीने थैमान

दरम्यान, गेल्या आठवड्यात मराठवाड्यासह विदर्भात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने थैमान घातले होते. जालना जिल्ह्याला गारपिटीचा सर्वाधिक फटका बसला होता. गारपिटीमुळे 11 जिल्ह्यातील सुमारे 50 तालुक्यांमधील 1086 गावांमधील 1 लाख 24 हजार 294 हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते.

बातम्या आणखी आहेत...