आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशकात 100 एकरवर साकारणार वेलनेस हब; सर्व प्रकारच्या उपचार पद्धती एका छताखाली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - आजचे ताणतणावाचे जीवन लक्षात घेता अारोग्यसंवर्धनासाठी विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. हीच बाब लक्षात घेऊन त्र्यंबकेश्वर-इगतपुरी मार्गावर तब्बल १०० एकर जागेत वेलनेस हब पीपीपी तत्त्वावर उभारले जाणार आहे. येत्या महिनाभरात यासाठी जागा निश्चित करण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा असलेले हे वेलनेस हब २०२० पर्यंत पूर्णत्वास येणार असून यामुळे जिल्ह्यातील आरोग्य पर्यटनास वाव मिळणार आहे.   


अारोग्यदायी वातावरणामुळे अारोग्यसंवर्धनासाठी दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक हेल्थ टुरिझमच्या दृष्टीने नाशिकला विशेष पसंती देतात. याच पार्श्वभूमीवर पर्यटक, नागरिकांना एकाच ठिकाणी विविध आरोग्यसुविधा मिळावी तसेच पर्यटनालाही वाव मिळावा या दृष्टीने पर्यटक विकास महामंडळाच्या पुढाकारातून जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर- इगतपुरी या परिसरात १०० एकर जागेवर जागतिक दर्जाच्या सुविधा असलेले  वेलनेस हब उभारले जाणार आहे. या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना एकाच छताखाली आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, स्टोन थेरपी, योगा थेरपी असे विविध उपचार उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. खासगी गुंतवणुकीच्या माध्यमातून साकारल्या जाणाऱ्या या वेलनेस हब उभारणीबाबत येत्या महिनाभरात या साठी जागा निश्चित केली जाणार आहेे.

 

आंतरराष्ट्रीय दर्जाचे असणार नाशकातील वेलनेस हब   
आशिया खंडातील आदर्शवत व आंतरराष्ट्रीय सुविधा, विविध उपचार पद्धती एकाच ठिकाणी असे वेलनेस हब उभारले जाणार आहे. इगतपुरी-त्र्यंबक या ठिकाणी या वेलनेस हबसाठी १०० एकर जागा यासाठी महिनाभरात जागा निश्चित होणार आहे.
- आशुतोष राठोड, सहव्यवस्थापकीय संचालक, पर्यटन विकास महामंडळ

बातम्या आणखी आहेत...