आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेजारी राहाणार्‍या 15 वर्षीय मुलीला लग्नाचे आमिष दाखवून त्याने रात्रभर केला लैंगिक अत्याचार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- शेजारी राहणाऱ्या  अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवत तिला नातेवाइकाच्या घरी नेऊन अत्याचार करण्याचा प्रकार नाशकात उघडकीस आला आहे. याप्रकरणी संशयित तरुणास पोलिसांनी अटक केली आहे.

 

पोलिसांनी दिलेली माहिती आणि पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार, मंगळवारी रात्री ८ वाजता  ती विनयनगर येथे किराणा दुकानात आली असताना संशयित सुरेश देवराम मुकणे (भारतनगर) याने तिला दुचाकीवर बसवून पाथर्डी शिवारात राहणाऱ्या त्याच्या आत्याच्या घरी नेले. लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर रात्रभर अत्याचार केले. याबाबत कुणास काही सांगायचे नाही, असा दम देऊन घरी आणून सोडले. भीतीपोटी तिने ही बाब कुणाला सांगितली नाही. मात्र, तिला, पोटाचा त्रास होऊ लागल्यानंतर कुटुंबीयांच्या हा प्रकार लक्षात आला. संशयिताविरोधात पॉक्साे कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात  आला.

 

बातम्या आणखी आहेत...