आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेट एअरवेजकडून नाशिक- दिल्ली विमानसेवेला प्रारंभ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक -  जेट एअरवेजकडून नाशिक- दिल्ली विमानसेवेला शुक्रवारी सुरुवात झाली. दिल्लीहून १४० प्रवाशांना घेऊन दुपारी २.०५  वाजता जेटचे १६८ आसनी बोइंग ७३७ विमान नाशिक विमानतळावर दाखल झाले. दुपारी २.३५ वाजता १२० प्रवाशांना घेऊन नाशिकहून दिल्लीकडे रवाना झाले. या विमानाला कार्गाेची सेवा उपलब्ध झाल्याने नाशिकहून ३ टन अांबे लंडनसाठी, तर १ टन ताजा भाजीपाला दुबर्इसाठी पाठवला गेला. यामुळे जेटच्या या सेवेमुळे केवळ नाशिककरांना देश-विदेशातील प्रवासच नव्हे, तर येथील भाजीपाला, फळे, फुले यांच्याकरिता जागतिक बाजारपेठ काही तासांवर अाली अाहे.  


केंद्र सरकारच्या उडान याेजनेंतर्गत नाशिक- दिल्ली या शहरांना जाेडणारी थेट विमानसेवा सुरू झाली. त्याला दाेन्ही शहरांतील प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिला. अाठवड्यातील तीन दिवस ही सेवा उपलब्ध राहणार असून भारतातील उदयोन्मुख शहरांशी प्रादेशिक कनेक्टिव्हिटी नाशिककरांना मिळणार अाहे.  

बातम्या आणखी आहेत...