आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक: नरबळी देण्यासाठी अवघ्या चार महिन्यांच्या बाळाचे अपहरण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इगतपुरी - त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दापुरे  पाचकुंडल्याचीवाडीतील झोपलेल्या महिलेच्या कुशीतून गुरुवारी रात्री ४ महिन्यांच्या बाळाचे अपहरण केल्याची घटना घडली. अंधश्रद्धेतून नरबळी देण्यासाठी या बालकाला पळवून नेल्याचे समजते. दरम्यान, ग्रामस्थांनी शोध घेतल्याने पळवून नेलेले बाळ  जंगलात सापडले असून त्याच्यावर त्र्यंबकेश्वर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 

मंगल चौधरी असे बाळाच्या आईचे नाव असून गुरुवारी पहाटे ३ च्या सुमारास हा प्रकार लक्षात आला. नंतर जंगलात बेशुद्ध अवस्थेत बाळ आढळले. जवळच कोंबडीचे पिल्लू, नारळ, वाटी, हळद, कुंकू असे साहित्य आढळले. त्यावरूनच नरबळीचा संशय व्यक्त होत आहे.

 

 

बातम्या आणखी आहेत...