आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केबीसीची 150 काेटींची जप्त मालमत्ता लिलावाच्या प्रतीक्षेत; 14 हजार पानांचे दाेषाराेपपत्र

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या केबीसीच्या काेट्यवधी रुपयांच्या घाेटाळ्यात तत्कालीन पाेलिस अायुक्त एस. जगन्नाथन यांनी अनुभव अाणि काैशल्य पणास लावून सिंगापूरमध्ये स्थायिक झालेल्या मुख्य सूत्रधार भाऊसाहेब चव्हाण व त्याच्या पत्नीस मुंबईत येण्यास प्रवृत्त करत त्यास जेरबंद केले. याच गुन्ह्यात अार्थिक गुन्हा शाेध पथकाने महाराष्ट्र ठेवीदार हितसंरक्षण प्रतिबंधक कायद्यान्वये चव्हाण याची सुमारे १५० काेटींची मालमत्ता जप्त करत त्याच्या लिलावासाठी न्यायालयात प्रक्रिया पूर्ण केली अाहे. मात्र, त्या जप्तीवर निर्णय हाेण्यापूर्वीच चव्हाण याला जामीन मंजूर झाल्याने पाेलिस प्रशासनासह ठेवीदारांमध्ये अस्थतता पसरली अाहे. 

  
केबीसी मल्टिस्टेट प्रा. लि. कंपनी स्थापन करून भाऊसाहेब छबू चव्हाण त्याचा भाऊ बापूसाहेब चव्हाण यांच्यासह त्यांचे मित्र अाणि नातेसंबंधीतील व्यक्तींना कंपनीचे संचालक बनवण्यात अाले हाेते. सुरुवातीला दामदुप्पट, तर त्यांनतर ठेवीदारांची गर्दी वाढताच तिपटीने ज्यादा व्याजदराचे अामिष दाखवून वेगवेगळ्या अाकर्षक याेजना केबीसीने बाजारात अाणल्या हाेत्या. विशेष म्हणजे, या याेजना गावागावात पाेहोचण्यासाठी एजंटांची माेठी साखळी उभी केली हाेती. महामार्गावरील हाॅटेल जत्राच्या बाजूूला अालिशान वातानुकूलित कार्यालयही थाटले हाेते. मात्र, मुदत पूर्ण हाेऊनही गुंतवणूकदारांना पैसे मिळत नसल्याने पैसे मागण्यांची गर्दी हाेऊ लागली. ठेवीदार एजंटच्या मागे लागताच एजंटने संचालकांचा पिच्छा पुरवताच चव्हाण दांपत्याने गाशा गुंडाळत थेट सिंगापूर गाठले. यात चव्हाण याने पूर्वनियाेजनाप्रमाणेच काेट्यवधींच्या ठेवी जमा हाेताच सिंगापूरला स्थायिक व्हायचे, असेच ठरवल्याचे दिसून अाले. दरम्यान, या गुन्ह्यात शहर व जिल्ह्याबराेबरच मराठवाड्यातील जालना, परभणी, औैरंगाबादसह उत्तर महाराष्ट्रातील गुंतवणूकदारांची संख्याही लक्षणीय अाहे. 

  
१९ मालमत्ता ४० काेटी जप्त   
राज्यभरातील ८,२२७ साक्षीदार व कुटुंबीयांचे जबाब नाेंदवण्यात अाले अाहेत. विशेष म्हणजे, घरकामगार महिला, शेतमजूर यांसारख्या मध्यमवर्गीय कुटुंबीयांनाच माेठा फटका बसला अाहे. यात सुशिक्षित बेराेजगार युवक, शेतकऱ्यांनी स्वतःच्या मालमत्ता विकून चव्हाण यांच्या अामिषाला बळी पडल्याचे जबाबात समोर अाले अाहे. पाेलिसांनी प्रशासनाकडून परवानगी घेत या गुन्ह्यात ठेवीदार हितसंरक्षक कायदा कलम लावण्याने त्याची शहर जिल्ह्यातील व इतर जवळपास १९ ठिकाणच्या स्थावर मालमत्ता जप्त केल्या अाहेत. त्याचबराेबर त्याच्या वेगवेगळे बँक लाॅकर, खाती सील करत सुमारे ४० काेटींची राेकड जप्त करण्यात अाली अाहे. यात केबीसीचे कार्यालय, चव्हाण कुटुंबीयांचे मनपा हद्दीतील बंगले, वाहने, प्लॉट अाणि चांदवड तालुक्यातील राहूड, हरणूल शिवारातील शेतजमीन, निफाड व इगतपुरी तालुक्यातील शेतजमीन अाणि अाडगाव शिवारातील प्लाॅट, शेतजमीन व पिंपळगाव बहुला शिवारातील जमीन अशी १५० काेटींची मालमत्ता जप्त करण्यात पाेलिसांना यश अले अाहे. 

 

१४ हजार पानांचे दाेषाराेपपत्र दाखल    

११ जुलै २०१४ राेजी अाडगाव पाेलिस ठाण्यात प्रथम गुन्हा दाखल झाला हाेता. आर्थिक गुन्हा शाेध पथकाचे उपअायुक्त विजयकुमार मगर, वरिष्ठ निरीक्षक अशाेक पन्हाळे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी तपास करत गुन्हा दाखल असलेल्या संशयित भाऊसाहेब छबू चव्हाण, त्याची पत्नी अारती, भाऊ बापूसाहेब चव्हाण, कविता चव्हाण, नानासाहेब चव्हाण, पाेलिस कर्मचारी संजय वामनराव जगताप, पाेलिस कर्मचारी रमेश हरिभाऊ साेनवणे यांच्यासह १३ जणांविरोधात गुन्हा दाखल करत अटक करण्यात अाली हाेती. यात भाऊसाहेब चव्हाण  व त्याच्या पत्नीस मे २०१६ मध्ये सिंगापूरहून भारतात येताच मुंबई विमानतळावर सापळा रचून अटक करण्यात अाली हाेती. तेव्हापासून चव्हाण कारागृहात हाेता. या संशयितांविरोधात पाेलिसांनी सुरुवातीला ११ हजार अाणि नंतर ३ हजार अशा पुरवणी जबाबाचे दाेषाराेपपत्र दाखल केले अाहे.    

 

दाेन वर्षांपेक्षा जादा काळ कारागृहात    
मुख्य संशयित भाऊसाहेब चव्हाण यास मे २०१६ मध्ये अटक केली असून त्यास दाेन वर्षांपेक्षा जादा काळ ताे कारागृहात अाहे. त्याच्याविरुद्ध दाेषाराेपपत्र दाखल झाले असून त्यात काहीही फेरफार हाेऊ शकत नसल्याने त्यास जामीन मागण्यात अाला. न्यायालयाने ताे मंजूर केला.
अॅड. अविनाश भिडे

बातम्या आणखी आहेत...