आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीचे मोटवानीरोडवरील उद्यानातून अपहरण; कारचालकाच्या सतर्कतेमुळे वाचली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- एकतर्फी प्रेमातून मुलीवर हल्ला, अॅसिड फेकण्याची धमकी दिल्याचे प्रकार ताजे असताना एका महाविद्यालयाच्या उद्यानात मैत्रिणीसोबत बसलेल्या मुलीचे तोंड दाबून कारमध्ये नेऊन तिचे अपहरण करण्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी (दि. ९) दुपारी २ वाजता मोटवानीरोडवरील एका महाविद्यालयाच्या गार्डनमध्ये उघडकीस आला. कारचालकानेच मित्राला विरोध केल्याने मुलीचा जीव वाचला. उपनगर पोलिसांनी या सडकसख्याहरीला अटक केली आहे. या घटनेमुळे महिला व मुलींच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा एेरणीवर अाला असून महाविद्यालय परिसरात पाेलिसांची गस्त वाढविण्याची मागणी केली जात अाहे. 


मुलींची सुरक्षा पुन्हा ऐरणीवर 
शाळा-महाविद्यालयातील मुलींची सुरक्षा पुन्हा एकदा या घटनेमुळे ऐरणीवर आली अाहे. यापूर्वी स्कूल बस अडवत दहावीच्या मुलीच्या अंगावर पाणी फेकत अॅसिड फेकण्याची धमकी देण्यात अाली हाेती. गंगापूररोडवर एका तरुणीला भररस्त्यात अडवत चाकूचा धाक दाखवत जिवे मारण्याची धमकी दिली होती. अशा अनेक घटनांमुळे शाळा-महाविद्यालय परिसरात मुलींना असुरक्षित असल्याने पालकवर्गात भीतीचे सावट पसरले आहे. 


गस्त कागदावर 
टवाळखाेरांकडून शाळा-महाविद्यालय परिसरात हाेणारे छेडछाडीचे प्रकार रोखण्यासाठी पोलिस आयुक्तांनी गस्त वाढवण्याच्या सूचना दिल्या हाेत्या. बीट मार्शलसह गुन्हे शोधपथकांना गस्त घालण्याचे अादेश दिले हाेते. या सूचनांचा अधिकाऱ्यांना विसर पडला असल्याचे थंडावलेल्या गस्तीतून निदर्शनास येत आहे. 


संशयितास अटक, कारचालकाची चाैकशी 
संशयितास तत्काळ अटक केली आहे. कारचालक घाबरल्याने त्याने विरोध केला. कार पुन्हा माघारी घेतल्याने मुलगी वाचली. कारचालकाची चौकशी केल्यानंतर त्याच्यावर कारवाई केली जाणार आहे. अशाप्रकारे कुठे अनुचित प्रकार घडत असल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. 
- प्रभाकर रायते, वरिष्ठ निरीक्षक

बातम्या आणखी आहेत...