आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोलेटमध्ये 80 हजार रुपये हरलेल्या तरुणाचे काॅलेजराेडवरून अपहरण, संशयितास अटक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- रोलेट या ऑनलाईन जुगार खेळात ८० हजार रुपये हरलेल्या युवकाचे अपहरण झाल्याचा प्रकार उघडकीस आला अाहे. तक्रार दाखल होताच पोलिसांनी संशयितास अटक केली; मात्र अपहरण झालेल्या तरुणाचा थांगपत्ता लागला नसल्याने या प्रकरणाचे गूढ वाढले आहे. 


या प्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती आणि सेवकराम दर्डा (रा. हिरावाडी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा मुलगा राहुल गुरुवारी (दि. २६) सायंकाळी ६ वाजता संशयित हर्षल सदाशिव गाडेकर (हिरावाडी) याच्या कॉलेजरोडवरील मॉस्को मेन्स वेअर या दुकानात गेला होता. ताे परत न अाल्याने हर्षलला विचारले असता त्याने 'राहुल लघुशंकेसाठी जातो असे सांगून गेला. त्यानंतरचे मला माहीत नाही.' गुरुवारपासून तो बेपत्ता असल्याची माहिती असूनही संशयित हर्षलने ती लपवली. चौकशीत राहुल रोलेटमध्ये ८० हजार रुपये हरला हाेता व गाडेकर याच्याकडून त्याने पैसे घेतले होते, अशी माहिती मिळाली. 


घेतलेले पैसे परत न केल्याने हर्षलनेच मुलाचे अपहरण केल्याची तक्रार दर्डा यांनी दिली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखत संशयित हर्षलला अटक केली. मात्र, चौकशीत राहुलचा थांगपत्ता लागू शकला नाही. संशयित दोन वर्षांपूर्वीच उल्हासनगर येथून नाशिकला राहण्यास आला होता. ताे कापडाच्या दुकानात काम करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सरकारवाडा पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


पाेलिसांकडून तपास सुरू 
अपहरण प्रकरणात संशयितास पोलिसांनी अटक केली. मात्र, अपहृत राहुल सापडला नाही. त्यामुळे या प्रकरणामागील गूढ वाढले आहे. तरुण सापडल्यानंतरच खरा प्रकार उघडकीस येणार असल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक अशोक भगत यांनी दिली. 

बातम्या आणखी आहेत...